Breaking

Chandrakant Patil : NEP च्या कार्यपद्धतीचा अहवाल तयार करा!

Implement the National Education Policy effectively : मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आदेश; प्रभावी अंमलबजावणीचे मूल्यमापन करावे

Mumbai राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठांचे एनईपी अंमलबजावणी संदर्भात मूल्यमापन करावे,अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक समस्या उद्भवत आहे. शैक्षणिक व्यवस्थेत काम करणाऱ्यांचा या अडचणी सोडविण्यात खूप वेळ जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुकाणी समितीची बैठक आयोजि करण्यात आली होतीय

Churchgate येथे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरशी (SNDT) महिला विद्यापीठ येथे ही बैठक झाली. ‘नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक याचत अधिकाधिक संवाद वाढवावा. महाविद्यालये, विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. अशी महाविद्यालये आणि विद्यापीठ निवडून त्यांच्या कार्यपद्धतीचा एकत्रित अहवाल तयार करावा, अशा सूचना पाटील यांनी केल्या.

Collector of Akola : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ तयार !

 

त्यामुळे राज्यातील शैक्षणिक संस्थांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणीवर हा अहवाल मार्गदर्शक ठरेल. तसेच सुकाणू समितीच्या अभ्यास गटाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील सविस्त अहवाल शासनाकडे सादर करावा. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून येणाऱ्या सूचना संदर्भात राज्याचा अहवाल तयार करावा. याबाबत आयोगाला कळवावे, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

Guardian Minister appointment in suspense : पालकमंत्री नाही तर काय झाले? प्रशासन लागले कामाला !

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपरमुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.उज्ज्वला चक्रदेव, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, सदस्य अनिल राव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.