Breaking

Amravati University : पश्चिम विदर्भाच्या प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास होणार

Regional imbalances of Western Vidarbha to be studied : शिक्षण-रोजगार स्थितीवर फोकस; विद्यापीठाकडून २० हजारांचे अनुदान

Amravati श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र (RERC) मार्फत पश्चिम विदर्भातील प्रादेशिक असमतोल या विषयावर एक महत्वाकांक्षी संशोधन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रातील जिल्ह्यांची स्थिती (२०१५ ते २०२५) यावर आधारित संशोधनासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

सदर प्रकल्पासाठी अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक पात्र आहेत. या संदर्भात डॉ. महेंद्र मेटे, समन्वयक, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र यांनी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे.

Sharad Pawar NCP : शरद पवार गट सरकारला विचारणार जाब!

प्रस्ताव सादर करण्यासाठी इच्छुकांनी ३० जूनपूर्वी प्रस्ताव सादर करावा. अधिक माहिती व प्रस्ताव सादरीकरणासाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

या संशोधन प्रकल्पाचा कालावधी ६ महिन्यांचा असून, यासाठी रु. २०,०००/- चे अनुदान दिले जाणार आहे. संशोधनाची व्याप्ती २०२० ते २०२५ अशी आहे. संशोधनात समाविष्ट मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:

Solar Scam : सोलर घोटाळा प्रकरणात नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

जिल्हानिहाय १०वी, १२वी व पदवी स्तरावरील विद्यार्थी गळतीचे प्रमाण
उच्च शिक्षण व संशोधनाच्या सुविधा आणि त्याचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
पदवी व पदव्युत्तर स्तरावरील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण
सरकारी व खाजगी क्षेत्रातील रोजगार उपलब्धता
केंद्र व राज्य शासनाच्या स्वयंरोजगार योजना (मुद्रा, स्टार्टअप, कर्ज योजना) यांचा आढावा
शिक्षण व रोजगारासाठी जिल्ह्यांचा विकास आराखडा तयार करणे