Breaking

MLA Umesh Yawalkar : निधी रद्द केला नाही, लोकहितासाठी वळवला!

Dispute between current and former MLAs over development funds : विकास निधीवरून राजकारण पेटले, आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Amravati वरूड-मोर्शी मतदारसंघातील विकास निधीच्या मुद्यावरून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी विद्यमान आमदार उमेश (चंदू) यावलकर यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपांना यावलकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “निधी रद्द न करता तो लोकहितासाठी वळवण्यात आला असून, विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत,” असे आमदार यावलकर यांनी स्पष्ट केले.

“२०१९ च्या निवडणुकीपूर्वी भुयार यांनी १५ कोटींच्या विकासकामांचा निधी घोषित केला होता. परंतु या कामांसाठी आवश्यक जागेची उपलब्धता किंवा नगरपरिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने, तो निधी केवळ निवडणुकीच्या तोंडावर टाकण्यात आला होता. शासनाचा निधी वाया न जाता योग्य ठिकाणी वापरावा म्हणून तो निधी इतर गरजेच्या कामांकडे वळवण्यात आला.”

Amravati Divisional Commissioner : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवे मापदंड!

“मी निधी रद्द केला नाही किंवा मतदारसंघाबाहेर वळवला नाही. याउलट, लोकहितासाठीच योग्य ठिकाणी तो वापरला गेला आहे. कामाची गरज आणि पात्रता याची पडताळणी करूनच निधी वाटप होणार आहे,” असे यावलकर म्हणाले.

“२०१९ मध्ये तुमच्या वाहनाची जाळपोळ झाली, गोळीबार झाला, त्यावेळी तुम्ही भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांच्यावर आरोप केला. मात्र, गेल्या पाच वर्षांत त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. तुमच्यावर मते मागणारे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे आणि माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यावरही तुम्ही खालच्या पातळीवर टीका केली. त्यावेळी समाजाची आठवण झाली नाही का?” असा सवालही यावलकर यांनी उपस्थित केला.

Minister Jaikumar Gore : विकासात समतोल, कुठेही भेदभाव नाही, मंत्र्यांचा दावा

“राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पराभूत उमेदवारांना वेळ देत नाहीत, म्हणून आता चुकीचे आरोप करून त्यांच्या जवळीक साधण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याने पुन्हा नौटंकी सुरू झाली आहे,” अशी टीकाही यावलकर यांनी केली.