Breaking

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सुधीर मुनगंटीवार यांची कामगिरी ‘लई पॉवरफुल्ल’

BJP Leader MLA Sudhir Mungantiwar’s performance is ‘Very Powerful’ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यातील एकुण कामांमध्ये बल्लारपूर मतदारसंघ आघाडीवर

Mumbai : राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार हे रोखठोक स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून पाठपुरावा कसा करायचा, आणि प्रभावी नेतृत्व कसे असावे, याचे त्यांनी वारंवार उदाहरण घालून दिले आहे.आज पुन्हा त्याच नेतृत्वाची ठसठशीत प्रचिती आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यभरातील एकूण आठ कामांपैकी १६७ कोटी रुपयांचे तब्बल पाच कामे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणले.हा निर्णय त्यांच्या प्रभावी जनप्रतिनिधित्वाचा पुरावा आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले आहे. प्रभावी नेतृत्वाची ठसठसीत छाप त्यांनी सोडली आहे. थेट संवाद, स्पष्ट मागणी, प्रभावी पाठपुरवा आणि प्रशासनावर पकड ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. सभागृहात त्यांनी वेळोवेळी दिलेले मुद्देसुद आणि तडाखेबंद भाषण, सोबतच निधी खेचून आणण्यातील तंत्रशुद्ध कामगिरी यांमुळेच त्यांनी हा ठसा उमटवला आहे. त्यांच्या बल्लारपूर मतदारसंघासाठी मंजूर कामांसाठी १६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आता पोंभूर्णा शहरातील अनेक विकास कामांना वेग येणार आहे.

Crime news : ‘ मै वापस आऊंगा…’ म्हणत नराधमाने तिच्यासोबत काढली सेल्फी

या कामांचा आहे समावेश..
– चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात मरेगाव-राजगड-गडीसूर्ला-थेरगाव-वढोली-घाटकुल रस्ता (घाटकुल ते भीमनी फाटा) आणि केळझर स्टेशन ते सुशी नवेगाव भुज कोरंबीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामासाठी ४५ कोटी रूपये मंजुर.
– बल्लारपूर मतदारसंघातील आक्सापूर ते चिंतलधाबा रस्त्याच्यामध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व दोन लहान पुलांचे बांधकामासाठी ५० कोटी रूपये मंजुर.
– चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील मरेगाव-आकापुर-राजगड-फिस्कुटी-गडीसूर्ला-भेजगाव-सिंताळा-थेरगाव-वेळवा-सोनापूर-चेक-बल्लारपूर-वढोली-घाटकुल रस्त्याचे बांधकाम. घाटकुल येथे भूसंपादनासह वळणमार्गाचे बांधकामासाठी १७ कोटी रुपये मंजूर.
– चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील कोसारा-सोईट-वरोरा-मोहोर्ली चंद्रपूर-जुनोना-गिलीबीली-पोंभुर्णा-नवेगाव-मोरे रस्त्याचे बांधकाम. या रस्त्यावर मोठ्या पुलाचे व पोचमार्गाचे भूसंपादानासह बांधकाम करणे तसेच सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर.
– चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील जुनोना-गिलबिली-सातारा-तुकूम-पोंभुर्णा-नवेगावमोरे रस्ता व नवेगावमोरे येथे वळणमार्गाचे भूसंपादनासह बांधकामासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

यापूर्वीही आमदार मुनगंटीवार यांनी अफाट विकासकामे करून चंद्रपूर जिल्ह्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. सैनिकी शाळा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वन प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन अकादमी), बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बॉटनिकल गार्डन, कॅन्सर हॉस्पीटल उभारले जात आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, SNDT महिला विद्यापीठाचे केंद्र, डायमंड कटिंग सेंटर, सोमनाथ (मुल) कृषी महाविद्यालयाला मंजुरी, पोंभूर्णा येथे बांबू हॅंडीक्राफ्ट व आर्ट युनिट, टूथपिक उत्पादन केंद्र, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान. आगरझली-बटरफ्लाय गार्डन.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : १५ वर्षांपासून मुनगंटीवार लागले होते मागे, आता पोंभूर्ण्याची एमआयडीसी लवकरच होणार !

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, अजयपूर शेतकरी प्रशिक्षण केंद्र, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचे आधुनिकीकरण, चंद्रपूर फ्लाइंग क्लब. बल्लारपूर यथे सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र लवकरच सुरू होत आहे. याशिवाय इतरही बरीच कामे आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलेली आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी केवळ विकासाचे नव्हे, तर उद्योग, शिक्षण, पर्यावरण, पर्यंटन आणि रोजगार निर्मितीच्या दिशेनेही मोठी झेप घेतली आहे. हजारो कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यात खेचून आणणे, हे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचे जिवंत उदाहरण आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाच कामांची मिळालेली मान्यता ही आकड्यांमधील यशाची केवळ एक झलक आहे. आमदार मुनगंटीवार यांची नेतृत्वशैली निर्णयक्षम, अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदलवणारी ही कामगिरी ‘लई पॉवरफुल्ल’ ठरत आहे, हे येथे उल्लेखनीय.