City buses will get shelters in rural areas : प्रशासनातील समन्वयाची होतेय चर्चा, ‘आपली बस’ला मिळणार छत
Nagpur मंत्र्यांनी कितीही घोषणा केल्या, योजना आणल्या तरीही प्रशासनातील समन्वयाचा अभावच विकासात अडथळा ठरत असतो. मात्र एखाद्या कामात प्रशासन स्वतः समन्वय साधून नागरिकांची सोय करत असेल तर त्याचे कौतुक होणारच. नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ला शेल्टर देण्याचा निर्णय नगर परिषद व नगरपंचायतींनी घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेची ‘आपली बस’ आता बुटीबोरी, पाटणसावंगी, हिंगणा, कन्हान, कळमेश्वरपर्यंत पोहोचली आहे. या मार्गावरील थांबे नगर परिषदा व नगरपंचायतींच्या हद्दीत येतात. इथे प्रवाशांच्या थांब्यासाठी शेल्टर नाहीत. मात्र आता स्थानिक प्रशासन त्यांच्या हद्दीत बस शेल्टर उभारणार आहे. यासंदर्भातील निर्देश महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीत पुन्हा ११० बस शेल्टर पीपीपी योजनेंतर्गत बांधले जाणार आहेत. तसेच, आपली बसच्या हद्दीत १६३९ बसथांबे उभारण्यात येणार आहेत.
Demolition of British-era rest house : ब्रिटिशकालीन विश्रामगृह पाडणे आले अंगलट!
महापालिकेची परिवहन सेवा आपली बस म्हणून ओळखली जाते. या लोकल ट्रान्सपोर्टने जिल्ह्याचा बऱ्यापैकी भाग व्यापलेला आहे. आपली बसच्या बसेस आता नगर परिषद व नगर पंचायतीच्या हद्दीत पोहचल्या आहेत. ज्या नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये बसेस जातात, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या प्रवाशांसाठी बस शेल्टर उभारायचे आहे. त्यासंदर्भातील निर्देश परिवहन व्यवस्थापकांनी दिले आहे.
सध्याच्या परिस्थितीत महापालिकेच्या हद्दीत २४५ बस शेल्टर आहे. हे बस शेल्डर साइन पोस्ट या खासगी संस्थेमार्फत उभारण्यात आले होते. मात्र, परिवहन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ३५५ बस शेल्टरची गरज आहे. संस्थेने उभारलेल्या शेल्टरपैकी विविध बांधकामांमुळे १५ शेल्टर हटविण्यात आले आहे. आपली बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुन्हा ११० नवीन शेल्टर उभारण्याचे निर्देश साइन पोस्टला दिले आहे.
Vidarbha Farmers : बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
आपली बसच्या हद्दीमध्ये १६३९ बस थांबे आहेत. या बसथांब्याच्या मंजुरीसाठी वाहतूक पोलिस विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वाहतूक विभागाकडून प्रस्ताव मंजूर झाल्यास १६३९ बसथांब उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.