Unnatural sexual assault on woman lawyer : पती, सासऱ्यासह चौघाविरुद्ध गुन्हे दाखल
Nagpur शहरातील एका महिला वकीलावर पतीकडून वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच सासरच्या मंडळीकडून माहेरून हुंडा आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पती व न्यायाधीश असलेला सासरा व सासू व नणंद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने विधीक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सुनील, त्याचे वडील, आई व बहीण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ३० वर्षीय प्रणालीच्या (सर्वांची नावे बदललेली) तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील हा ऑनलाइन गेम ट्रेडिंगचे काम करतो. त्याचे वडील न्यायाधीश आहेत. प्रणाली वकील आहे. नोव्हेंबर २०२३मध्ये प्रणालीचे सुनील याच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर सुनीलने पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली.
MLA Ashish Deshmukh : सावनेरमध्ये गुंडागर्दीचे राजकारण खपवून घेणार नाही !
‘माझे वडील न्यायाधीश आहेत. मी काहीही करू शकतो’, असे म्हणत त्याने प्रणालीचा छळ सुरू केला. त्यानंतर सुनीलचे वडील, आई व बहिणीनेही प्रणालीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. रोज सकाळी ६ वाजता सुनीलची आई त्याला हॉलमध्ये बोलवायची. प्रणाली हिच्या कुटुंबीयांनी तुझ्यावर काळी जादू केली आहे., असे म्हणायची.
याचदरम्यान एप्रिल महिन्यात दर मंगळवारी रात्री सुनील व त्याचे नातेवाईक घरात अघोरी पूजा आणि मंत्राचा जप करायचे, असे प्रणालीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जानेवारी २०२४मध्ये सुनीलने पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे तिची प्रकृतीही खालावली. या घटनेनंतर तो नेहमीच प्रणाली वर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लागला.
जानेवारीला प्रणाली न्यायालयातील काम आटोपून घरी परतली. पत्नीला न्यायालयात जाण्यास बंदी घातली. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी त्याच्या बहिणीने शिवीगाळ करीत टोमणे मारले. १० जानेवारीला सासूने मारहाण करून माहेराहून ५० लाख रुपये हुंडा आणण्यास सांगितले.
Vijay Wadettivar : वडेट्टीवारांचा मविआ नेत्यांना घरचा अहेर !
न्यायधीश सासऱ्याकडून शिवीगाळ
जून महिन्यात प्रणालीच्या सासऱ्यानेही तिला शिवीगाळ केली. ‘रात्री दार उघडे ठेऊन झोपत जा, कॅमेरेही सुरू ठेवत जा, अन्यथा वाईट परिणाम होतील’, अशी धमकी दिली. १ ऑगस्टला सायंकाळी प्रणाली स्वयंपाकघरात होती. यावेळी तिचा सासरा तेथे आला. सासऱ्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. दरम्यान, २२ ऑगस्टला पतीने प्रणालीच्या गुप्तांगात ५०० रुपयांची नोट टाकली व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ वाढत असल्याने प्रणालीने अखेर अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.