Strike by Sarpanch, members Beed incident impact : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे जबरदस्त पडसाद
Wardha बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे जबरदस्त पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्यांनी एक दिवस कामबंद आंदोलन केले. दरम्यान जिल्ह्यातील गावगाडा थांबला. ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प पाडून हत्याकांडाचा निषेध नोंदवला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे राज्यातील सर्व सरपंचांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सरपंच संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायती तीन दिवस बंद ठेवल्या होत्या. मात्र, अद्यापही हा तपास संथगतीने सुरू असल्याने ९ रोजी पुन्हा सरपंच संघटनेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आहे.
Nagpur Improvement Trust : काय सांगता? नासुप्रची इमारत पाडणार ?
सरपंच व ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना संरक्षण कायदा असावा, प्रत्येक ग्रामसभेला पोलिस संरक्षण अनिवार्य करावे, सरपंचांना विमा संरक्षण द्यावे व पेन्शन लागू करावी, ग्रामसभा सर्व ग्रामवासीयांसाठी असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत इतरांना कायद्याचे प्रतिबंध असावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामकाज बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या त्या तहसीलदारांना मागण्यांची पूर्तता करण्याबाबतचे निवेदन दिले.
बीडच्या घटनेवरून राजकारण
बीडच्या घटनेनंतर राजकारणही चांगलच ढवळून निघालं आहे. विधानसभा निवडणुकीत दमदार विजय प्राप्त करणाऱ्या महायुतीला या घटनेने अडचणीत आणले आहे. सरपंचांच्या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे विरोधकांना अजित पवार आणि महायुती सरकारला घेरण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच नेते मुंडे यांच्या राजीनाम्याचे संकेत देत आहेत. धर्मराव बाबा आत्राम यांनी तर मुंडे यांचा राजीनामा अजितदादाच घेतील, असे संकेत दिले आहेत.