Ration of 4.88 lakh beneficiaries will be stopped if E-KYC not done : ई-केवायसी करण्यासाठी आज अखेरचा दिवस, शासनाचा इशारा
Buldhana जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले असून, ३१ जुलैनंतरही ई-केवायसी न केल्यास संबंधितांचे रेशनचे लाभ थांबवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील एकूण १९ लाख १७ हजार २१९ लाभार्थ्यांपैकी केवळ १४ लाख २९ हजार ८० जणांनीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, उर्वरित ४ लाख ८८ हजार १३१ लाभार्थ्यांनी अद्यापही याकडे दुर्लक्ष केले आहे.
राज्य शासनाने यापूर्वी दोन ते तीन वेळा मुदतवाढ दिली असून, ही अंतिम मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. त्यानंतर या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मिळणारे धान्य वितरण थांबवण्यात येणार आहे.
Zilla Parishad School : ‘आमच्या शाळेला शिक्षक द्या हो,’ विद्यार्थ्यांचे आंदोलन
बोगस शिधापत्रिकांमुळे सरकारी धान्याचा अपव्यय होत असल्याने, शासनाने ई-केवायसीची अट लागू केली आहे. ई-केवायसी न झाल्यास, अशा अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही. यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच सरकारी धान्याचा लाभ मिळेल, असा शासनाचा उद्देश आहे.
Samruddhi Mahamarg : समृद्धीच्या अंडरपासमध्ये पावसाचे चिखल, शेतकऱ्यांना त्रास
प्रशासनाने लाभार्थ्यांना ३१ जुलैपूर्वी आपले ई-केवायसी केंद्रावर जाऊन पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा, १ ऑगस्टपासून शिधावाटप बंद होण्याचा धोका आहे. त्यामुळे अजूनही ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.