CJI Bhushan Gavai : “सरन्यायाधीश साहेब, जे बोललात ते करा!”

Thackeray group’s direct appeal to the Supreme Court : ठाकरे गटाचं सर्वोच्च न्यायालयाला थेट आवाहन

 

Mumbai : गद्दार आमदारांना नोटीस नाही, निकाल नाही… मग लोकशाही कुठे गेला? या रोषातून उद्धव ठाकरे गटाने आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना थेट आवाहन केलं आहे “तुम्ही जे बोललात, ते आता कृतीत उतरवा!” सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने तीव्र शब्दात न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे.
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केल्यानंतर, ठाकरे गटाने त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र निकाल शिंदे यांच्या बाजूने लागला. शिवाय, निवडणूक आयोगाने पक्ष आणि धनुष्यबाणाचे चिन्ह शिंदे गटाला देऊन उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला.

Sudhir Mungantiwar :सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस जिल्हाभर ‘विकास दिन’ म्हणून साजरा

आजही, पक्ष आणि चिन्हाबाबतचा मुद्दा प्रलंबित आहे. दरम्यान, तेलंगणातही अशाच ‘गद्दार आमदारां’च्या नोटिसाही सात महिन्यांपासून पाठवल्या नाहीत, यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्यावर आता अग्रलेखातून सरन्यायाधीश गवई यांना जबाबदारीची आठवण करून देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर लोकशाहीचं कलेवर पडले आहे.
त्यात प्राण फुंकण्याचं काम न करता, आता न्यायदेवताच ‘वाचवा वाचवा’ असा टाहो फोडतेय.यात एकाच वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या अकार्यक्षमतेवर आणि वाढत्या राजकीय बेभरवशावर घणाघात केला आहे. गद्दारी, खरेदी-विक्री, पक्षफुटी, आणि नियमांची पायमल्ली या गोष्टींनी महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील लोकशाही संकटात असल्याची भीती व्यक्त केली आहे.

Rajendra Raut : तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटला, तुमचे आजोबा कुठे नोकरीला होते?

उद्धव ठाकरे गटाने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, “फक्त तारखा देऊन लोकशाहीचा येरझार नको. निकाल द्या. न्याय करा. कारण एकाच वेळी महाराष्ट्रात पक्षांतरे झाली, निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिले, विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढूपणा केला आणि आता सर्वोच्च न्यायालयही प्रलंबित प्रकरणांमध्ये वेळ घालवत आहे.
“सरन्यायाधीश महोदय, देश आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतो आहे”, हे वाक्य आता फक्त सादरीकरण नाही, तर राजकीय असंतोषाचं आणि लोकशाहीवरील विश्वासाचं प्रतीक बनलं आहे. फक्त भाषणं, वक्तव्यं आणि चिंता व्यक्त करून लोकशाही वाचत नाही. न्यायदेवतेला कृती दाखवावी लागते, कारण जनता आता “तारखा नाहीत, निकाल द्या” असं ठणकावत आहे! असेही या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

____