Butibori road closed for three months says NHAI : उड्डाणपुलाला तडे गेल्याने दुरुस्तीसाठी अधिसूचना
NHAI Nagpur अवघ्या साडेतीन वर्षांत तडे गेलेला बुटीबोरी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे आता पुढील तीन महिन्यांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. जिल्हा वाहतूक शाखेने याबाबतची अधिसूचना काढली आहे. उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. नागपूर चंद्रपूर-वर्धा मार्गाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील (महामार्ग क्रमांक ४४) बुटीबोरी येथील उड्डाणपुलाला २४ डिसेंबर रोजी तडे गेले होते.
जड वाहन या पुलावरून गेल्याने सहा ते सात ठिकाणचा पुलाखालील सिमेंटचा भाग तुटला असल्याचे एनएचएआयकडून सांगितले जात होते. मात्र जड वाहनांची क्षमता असल्याचे एनएचएआयकडून सांगितले जात आहे. असे असताना हा पूल का खचला याबाबत तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहे. दिल्लीहून तज्ज्ञांची चमू येऊन गेली. व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांकडून या पुलाची तपासणी करण्यात येत आहे. याचा अहवाल मात्र अद्यापही प्राप्त व्हायला आहे.
Panchayat Samiti sabhapati : नवा गडी नवा राज, सोडत निघताच नावांची चर्चा सुरू !
एनएचएआयची चमूही यावर बारीक लक्ष ठेऊन आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने वर्धा व चंद्रपूरकडून बुटीबोरी मार्गे नागपूरकडे जाणारी जड वाहतूक वळविण्यात आल्याची अधिसूचना अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांनी काढली. १० जानेवारी ते ९ एप्रिलपर्यंत ही अधिसूचना अंमलात आणण्यात येणार आहे.
वाहतूक वळवली
वर्धा ते नागपूरकडे जाणारी वाहतूक ही वर्धा रोड-एनसीसी चौक अंडरपास-सर्विस रोड डाविकडे-अग्निशमन कार्यालय-इंडोरामा कंपनी-उजवीकडे वळून सालईधाबा मार्गे समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जाईल. चंद्रपूर ते नागपूरकडे जाणारी वाहतूक ही वाय पॉइंट डाविकडे वळून वर्धा रोड-एनसीसी चौक अंडरपास-सर्विस रोड डाविकडे-अग्निशमन कार्यालय-इंडोरामा कंपनी उजविकडे वळून सालईधाबा मार्गे समृद्धी महामार्गाने नागपूरकडे जाईल.
खोळंबा होणार
वर्धा रोड हा सदैव गजबजलेला असतो. या मार्गावर नागपूरपासून चार उड्डाणपूल झाले तरीही वाहतूक कमी झालेली नाही. एक बायपासदेखील आहे, मात्र तरीही प्रचंड वर्दळ असते. अशात तीन महिने बुटीबोरी पूल तीन महिने बंद राहणार म्हटल्यावर वाहतुकीचा खोळंबा होणे निश्चित आहे.