Feder service from Metro Stations : ई स्कूटरची सेवा उपलब्ध ; महामेट्रो-स्विच ई राइड यांच्यात सामंजस्य करार
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महामेट्रोने आता मेट्रो स्थानकावर ई रिक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. महामेट्रो नागपूर आणि टी एस स्विच ई-राइड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात मेट्रोभवन येथे नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
या प्रकल्पाचा उद्देश कमी खर्चात पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. मेट्रोच्या प्रवाशांची सुविधा व्हावी यासाठी मेट्रो स्थानकाजवळ ई स्कूटर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. अॅपच्या आधाराने कुणीही स्मार्टफोनचा वापर करून आपली राइड बुक करू शकतो. आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्याची सुविधाही उपलब्ध असेल.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. नियमांचे पालन करूनच ई रिक्षांना परवानगी दिली जाईल. या करारामुळे पर्यावरणपुरक वाहतुकीला प्रोत्साहन दिले जाईल. शहरातील प्रदूषणही कमी होईल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला.
मेट्रोच्या वेळापत्रकानुसार ई रिक्षाचे वेळापत्रक निर्धारित केले जाईल. मेट्रोच्या शेवटच्या फेरीनंतर १५ मिनिटांनीही ई रिक्षा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून ‘रिअल टाइम अलर्ट आणि ट्रॅकिंग सिस्टिम’वर भर देण्यात आला आहे.
Public transport चा वापर वाढेल
मेट्रोमुळे रस्त्यांवरील मोठी वर्दळ कमी झाली आहे. ई रिक्षाची फिडर सेवा मिळाल्यानंतर आता अधिकाधिक प्रवासी मेट्रोचा वापर करतील, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला. नागपूरकरांचा मेट्रो प्रवास सुखकर करण्यावर अधिक भर दिला जात आहे. स्थानिक प्राधिकरणांना सहभागी करून घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याचा उद्देश असल्याचे महामेट्रोने सांगितले.