MLC Sandip Joshi : युवा मोर्च्याचा कार्यकर्ता ते महापौर अन् आता आमदार!

birthday to be celebrated as ‘Lokseva Day’ : संदीप जोशींच्या जिद्दीचा प्रवास; ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा होणार वाढदिवस

Nagpur राजकारणात एका पराभवाने जो खचला तो कायमचा संपला, असं म्हणतात. नागपूर शहराचे माजी महापौर व विद्यमान आमदार संदीप जोशी यांनी कित्येक अपयशं सहज पचवली आणि पुढचा प्रवास केला. पक्षातील पदं घेऊन फक्त पुढे चालत गेले असं नव्हे, तर जिद्दीनं प्रवास केला. लोकसंग्रह वाढवला. लोकांच्या अडीअडचणीत धावून गेले. भारतीय जनता युवा मोर्च्याचा एक साधा कार्यकर्ता ते महाराष्ट्राच्या उपराजधानीचा महापौर आणि आता विधानपरिषद आमदार… अशी अफलातून ‘झेप’ त्यांनी घेतली. वाढदिवसाच्या निमित्तानं आज (दि. २० ऑगस्ट) त्यांच्या लोकसंग्रहाची प्रचिती येत आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेतील आमदार संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. २० ऑगस्ट) दिवसभर सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये होणाऱ्या या उपक्रमांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे. विशेष म्हणजे हा दिवस ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

Crisis on state : राज्यावर पाऊस, वादळ, विजा असं तिहेरी संकट !

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ ते १० या वेळेत आमदार संदीप जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.४५ वाजता बॅटरी ऑपरेटेड गाड्यांचे वितरण करण्यात येईल. सकाळी १० वाजता श्रद्धानंद अनाथ आश्रमात फळवाटप, सकाळी १०.१५ वाजता ज्युपिटर हायस्कूल, खामला येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. याचबरोबर अमृत लॉन, मनीषनगर येथे शासकीय योजनांविषयी माहिती देणारे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी ११.१५ वाजता रामेश्वरी परिसरातील संत कैकाडी महाराज उद्यान येथे आरोग्य शिबिर घेण्यात येईल. त्यानंतर ११.३० वाजता धनश्री मंगल कार्यालय, भगवान नगर येथील बुद्ध विहार येथे भंतेजींना चिवरदान करण्यात येईल. सकाळी ११.४५ वाजता मेडिकल पारिसरातील ‘दीनदयाल थाळी’ ला आमदार संदीप जोशी भेट देतील.
दुपारी व सायंकाळीही अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी १ ते ३ या वेळेत जनसंपर्क कार्यालयात भेटीगाठी होतील. सायंकाळी ५ वाजता तकीया येथील बिरसा मुंडा हॉलमध्ये सुंंदरकांड पठण होणार आहे. ५.३० वाजता वासुदेव नगर मेट्रो स्टेशन समोरील लुंबिनीनगर बुद्धविहार येथे हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम होईल.

Rain alert : राज्यात कोसळधार! 10 लाख एकर शेती पाण्याखाली,

सायंकाळी ६.३० वाजता भगवती लॉन, त्रिमूर्तीनगर येथे भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ७ वाजता नरेंद्रनगर चौक येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येईल. सायंकाळी ७.३० वाजता रामेश्वरीतील काशीनगर येथे दहीहंडी कार्यक्रमाला आमदार जोशी उपस्थित राहतील. आमदार संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आयोजित होत असून त्या माध्यमातून त्यांच्या लोकाभिमूख कार्याचा पुन्हा एकदा प्रत्यय येणार आहे.