Ashish Jaiswal : आता धाडस दाखवावं, मग उद्धव ठाकरेंना कळेल !

Now show courage, then Shiv Sena chief Uddhav Thackeray will know : टायगर कॉरिडोर संदर्भात फेक नरेटीव्ह सेट करण्यात आला होता

Nagpur : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्ष महत्वाचा नाही, तर व्यक्ती महत्वाचा असतो. हे धाडस उद्धव ठाकरे यांना दाखवावं. मागे त्यांनी भाजपची साथ सोडूनही उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली होती. अगदी तसंच धाडस त्यांनी आता दाखवावं मग त्यांचे सहकारी पक्ष त्यांना कशी वागणूक देतात, हे त्यांना कळेल, असे राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांनी म्हटले आहे.

सर्वांच्या सहकार्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली तर त्यातून देशात एक चांगला संदेश जाईल, असेही जायसवाल म्हणाले. टायगर कॉरीडोरसंदर्भात विचारले असता, टायगर कॉरीडोरच्या संदर्भात फेक नरेटीव्ह सेट करण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारने दोन वेळा सर्वे केला. यामध्ये मूळ आधार काहीच नव्हता. परंतु त्याला चुकीच्या मार्गाने कॉरीडोर सांगण्यात आले.

Jaljeevan Mission : जलजीवन मिशन थकीत देयकांवरून कंत्राटदार आक्रमक

जे प्रकल्प २०१६ आणि २०२१ मध्ये सर्वेत आले, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या बैठकीत मी हा मुद्दा उपस्थित केला होता. कॉरीडोरची व्याख्या देशात आणि महाराष्ट्रात वेगवेगळी राहू शकत नाही. ती अॅडव्हांस इंडियासारखी असायला हवी, असं मत मी मांडलं होते आणि ते मान्यही करण्यात आलं होतं. प्रवेश पोर्टल आणि २०१४ मधील सर्वे योग्य आहे. काही लोक विकास कामांचा विरोध करण्यासाठी याचिका दाखल करत असतात. देव त्यांना सुबुद्धी देवो, असे राज्यमंत्री जायसवाल म्हणाले. यासंदर्भात खुली चर्चा केली तर मी त्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मी तयार आहे, असेही ते म्हणाले.