Demand to the government for compensation to the farmers : शिवसेना आक्रमक; राज्य सरकारचे पाप शेतकरी भोगत असल्याचा आरोप
Akola अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान कमी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहिले, असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाने शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत धाव घेतली. कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी शिवसेना नेत्यांनी हे राज्य सरकारचे पाप असून, त्यांचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्याचा आरोप केला आहे. मायबाप सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देईल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटतले. पीक विमा योजनेच्या माध्यमातून तरी नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असते. त्यासाठीचा प्रीमियम म्हणून शेतकरी आणि केंद्र राज्य सरकार हा हिस्सा भरते. खरीप हंगामात कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना फटका बसला. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अनेकदा अतिवृष्टी झाली.
Dr. Pankaj Bhoyar: लोकसंख्या वाढतेय, पाणी पुरवठ्याचे नियोजन करा
ऑक्टोबर महिन्यातही नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळाला नाही. याबाबत जाब विचारण्यासाठी शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जि.प. गटनेते गोपाल दातकर, योगेश्वर वानखडे, ज्ञानेश्वर गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात धाव घेत मोबदला देण्याची मागणी लावून धरली.
२९ हजार १९० शेतकरी अपात्र
एकूण ४ लाख २५ हजार २३६ शेतकऱ्यांनी विमा भरला. एकूण क्षेत्रफळ ३ लाख ४४ हजार १४२ हेक्टर आहे. ३ लाख ४७ लाख ७९५ शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे दाखल केले. सध्या ३ लाख १८ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे दावे मंजूर आहेत. २९ हजार १९० शेतकरी अपात्र ठरले आहेत.
शिवसेनेने दिले पत्र
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२४मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक, अॅपवर तक्रारी केल्या. कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. कंपनी प्रतिनिधी २५ टक्के पेक्षा जास्त विमा तक्रारी असल्याने पीक कापणी प्रयोग तक्त्यानुसार भरपाई मिळेल असे म्हणत आहेत. परंतु, कपाशीची वेचणी ५-६ वेळा होत असून, प्रयोगामध्ये ते समाविष्ट होऊ शकत नाही, असे शिवसेना नेत्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
Nitin Gadkari : सर, हेल्मटशिवाय गाडी चालवणाऱ्याला जेलमध्ये टाकता येईल का ?
पैसेवारी सरासरी ४७ पैसे
यंदा खरिपाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर झाल्याने दुष्काळ जाहीर होण्याचा व पर्यायाने शेतकऱ्यांना सवलती मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटातच आहे, यावर एकाप्रकारे शिक्कामोर्बत झाले असल्याने पीक नुकसानीचे मदत तातडीने मिळणे आवश्यक आहे.
मोबदला कधी देणार?
ऑगस्ट, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानाबाबत शिवसेना नेत्यांनी दिलेल्या पत्रातून सरकारनचे लक्ष वेधले आहे. ऑक्टोबर महिन्यात १४ हजार ७०६ शेतकऱ्यांची हानी झाली. २२ कोटी ७३ लाख ८६ हजार २९० रुपयांची नुकसान झाले होते. १४ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे ५७ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. नुकसान भरपाईसाठी ७९ कोटी ४ लाख ३५ हजार ९०८ रुपयांची आवश्यकता आहे, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.