Bacchu Kadu : बच्चू कडू आता राज्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणार

Statewide Yatra for Farmers and Farm Labourers Rights : प्रहार जनशक्ती पक्षाची राज्यभर ‘शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा’

Amravati प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने राज्यभर ‘शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेतून शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि दिव्यांग बांधवांच्या प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संदर्भात जिल्हानिहाय दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, तो 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर शासनदरबारी तोडगा काढण्याची मागणी केली जाणार आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप:

शेतकरी-शेतमजूर हक्क सभा: सकाळी 10 ते दुपारी 12

जिल्हास्तरीय प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक: दुपारी 1 ते 3

जिल्हास्तरीय बैठक: दुपारी 4 ते 5

शेतकरी-शेतमजूर हक्क सभा: सायंकाळी 6 ते रात्री 8

Raju Shetty : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या

बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम पार पडतील. जिल्हास्तरीय दौऱ्यातील अधिक माहिती संबंधित जिल्हा पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आली आहे.

Akash Fundkar : कामगार कीटच्या मुद्यावरून राजकारण पेटले

जिल्हानिहाय दौऱ्याचा कार्यक्रम:

30 ऑगस्ट: वाशिम, 31 ऑगस्ट: बुलडाणा, 03 सप्टेंबर: नागपूर, 04 सप्टेंबर: भंडारा, 05 सप्टेंबर: गोंदिया, 11 सप्टेंबर: वर्धा, 12 सप्टेंबर: चंद्रपूर, 13 सप्टेंबर: अकोला, 14 सप्टेंबर: यवतमाळ, 15 सप्टेंबर: लातूर, 17 सप्टेंबर: अमरावती, 18 सप्टेंबर: हिंगोली, 19 सप्टेंबर: परभणी, 20 सप्टेंबर: नांदेड, 23 सप्टेंबर: चंद्रपूर, 24 सप्टेंबर: गडचिरोली, 26 सप्टेंबर: बीड, 28 सप्टेंबर: धुळे, 29 सप्टेंबर: अहमदनगर, 30 सप्टेंबर: छत्रपती संभाजीनगर, 01 ऑक्टोबर: जालना, 05 ऑक्टोबर: जळगाव, 06 ऑक्टोबर: नाशिक.