The party is merging wi BJP Your luck is out, see that first : पक्ष भाजपमध्ये विलीन होतोय “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”
Mumbai: शिवसेनेच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोपाचा सामना सुरूच आहे. शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा करत म्हटलं की, “उद्धव ठाकरे यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश होईल. संजय राऊतांवर नाराज असल्यामुळे दसऱ्यानंतर सर्व आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.” या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे.
राऊत म्हणाले की, “हा दावा ते करत आहेत ज्यांचा आम्ही लोकसभेत दारूण पराभव केला होता. त्यांना का एवढं महत्त्व देता? ही त्यांची निराशा आहे. ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहे ते दुसऱ्यांचे आमदार विलीन करण्याची भाषा करत आहेत. आज आमच्या पक्षात जे आमदार-खासदार आहेत ते निष्ठावंत, शुद्ध आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधील आहेत. जे पैशाला विकले, ईडी-सीबीआयच्या धमक्यांना घाबरून गेले ते आधीच निघून गेले आहेत. अशांनी आमच्या खऱ्या निष्ठावंतांवर बोलणं म्हणजे शिवसेनेचा आणि हिंदूहृदयसम्राटांचा अवमान आहे.”
Subodh Saoji : पिक विम्याच्या पैशांसाठी माजी मंत्र्याचे सरकारला पत्र
तुमाने यांना उद्देशून राऊत म्हणाले, “हे आमदार कधीकाळी आमच्या मदतीने खासदार झाले होते. पण आमच्याकडून गेल्यानंतर त्यांचा पराभव झाला. मग त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणण्यात आलं. आता ते म्हणतात की शिवसेना फुटणार. आधी तुमचं नशीब फुटलेलं आहे, ते बघा.”
Contractual sanitation worker : मानधन कपातीविरोधात मंत्रालयापर्यंत पायी वारी
राऊतांनी असा दावा केला की, “भविष्यात शिंदे गट स्वतः भाजपमध्ये विलीन होणार आहे. त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. बहुतेक कृपाल तुमाने यांना हे माहीत नसावं.”या आरोप-प्रत्यारोपामुळे पुन्हा शिंदे-ठाकरे गटातील संघर्ष उघड झाला असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राजकारणात नवा कलाटणी येण्याची चिन्हं दिसत आहेत.
____