Maharashtra politics : महापालिका नियुक्त्यांवरून महायुतीत असंतोष !

Discussions of displeasure between Devendra Fadnavis and Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीच्या चर्चा

Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा रंगत आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून हा वाद उफाळला आहे. आतापर्यंत या महापालिकांवर बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकांवर आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्यानेही त्यांच्यात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. सध्या अ, ब, क वर्गातील महापालिकांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. तर आता 19 ड वर्गाच्या महापालिकांवरही सनदी अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. या महापालिकांत साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असून सुमारे 900 कोटींचा अर्थसंकल्प आहे. नगरविकास विभागात मुख्यमंत्र्यांचा वाढता हस्तक्षेप पाहून शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

Pressure for contract : राजकारण्यांच्या जवळच्या कंत्राट देण्यासाठी दबाव, पण..

एका बाजूला फडणवीसांबद्दल नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेना गटातही नाराजीचे नाट्य रंगत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विभागप्रमुखांची नेमणूक होताच अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी उघड उघड असंतोष व्यक्त केला आहे.

पश्चिम उपनगरात नियुक्तीवरून असलेली नाराजी आता दक्षिण मुंबईतही दिसून येत आहे. शिवडी विधानसभेत माजी नगरसेवक नाना अंबोले यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती झाल्याने स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. शिवडीतील 5 पैकी 4 शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी या नियुक्तीविरोधात राजीनाम्याच्या तयारीत आहेत. पक्षात प्रवेश करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्यानंतर पक्षात दाखल झालेल्यांना संधी दिल्याने अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Local Body Elections : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांचा शोध!

नाना अंबोले यांच्या नियुक्तीविरोधात सह्यांची मोहिम राबवली जात असून लवकरच शिंदेंना पत्र दिले जाणार असल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असताना, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली ही नाराजी एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरू शकते.