Devendra Fadnavis Must Confess His Sins : इंग्रजांचे धोरण त्यांनी आत्मसात केले
Nagpur : पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला. चक्क मतांची चोरी केली. मतदारांच्या अधिकारांवर त्यांनी डल्ला मारला आहे. महाराष्ट्रात जातीयवाद निर्माण करण्याचे काम केले. जाती-जातींमध्ये भांडणे लावली. उपमुख्यमंत्री असताना बंगल्यावर बसून त्यांनी हे उद्योग केले. त्याचे परिणाम आता समोर यायला लागले आहे. ‘भोगा कर्माची फळं’ हा धडा हळूहळू फडणवीसांना मिळणार आहे. इंग्रजांचे धोरण त्यांनी आत्मसात केल्याचे दिसून येत आहे. फडणवीसांनी केलेल्या पापांची कबुली द्यावी अन् जनतेची माफी मागावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
आज (१७ सप्टेंबर) अमरावतीमध्ये आले असता सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात जाहिरात वॉर सुरू झाले आहे. महायुतीमधील तीन टोळ्यांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतानाचे फडणवीसांचे फोटो लाऊन मोहित कंबोज यांनी जाहिराती दिल्या आहेत. धक्कादायक म्हणजे नको त्या ठिकाणी त्या जाहिराती लावण्यात आल्या. त्याची विटंबना झाली. कंबोज यांनी जाहिराती केल्यामुळे आता आपणही मागे रहायला नको म्हणून एकनाथ शिंदे यांनीही नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या जाहिराती देऊन सत्तेतील धुसफुसीचे उत्तर दिले आहे.
Reservation controversy : मुख्यमंत्र्यां समोर घोषणाबाजी, तर कुठे आत्मदहनाचा प्रयत्न !
महाराष्ट्रात जातीयवाद पसरवून सत्ताधारी मजा पाहात बसले आहेत. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद पेटवण्याचे काम यांनी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही खेळी आहे. येवढे करूनही या लोकांना मते चोरण्याची गरज पडते. पण आता जनता शहाणी झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये लोक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.