Municipal Corporation Election : अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष !

Final Ward Structure Draws Aspirants’ Attention : ६ ऑक्टोबरपर्यंत होणार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

Nagpur : महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर शंभराच्या वर हरकती व सुचना आल्या होत्या. यावर आलेल्या आक्षेपांवर सुनावणी आता आटोपली आहे. राज्य शासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांनी अंतिम प्रभाग रचनेचा विकास आराखडा नगर रचना विभागाकडे सादर केला आहे. यामध्ये कुणा-कुणाच्या सुचनांचा विचार केला गेला आणि काय बदल केले गेले, हे अंतिम रचना जाहीर झाल्यावरच कळू शकणार आहे. त्यामुळे अंतिम प्रभाग रचना केव्हा जाहीर होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले आहे.

२३ ऑगस्टला जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर आलेल्या आक्षेपांवर राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून शासनाने नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी ९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. हर्डीकर यापूर्वी काही काळ नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले आहेत. सुनावणीच्या वेळी काही माजी नगरसेवक व इच्छुक सदस्यांनी प्रारुपामद्ये सुधारणा करण्याची सुचना केली होती. त्यावर हर्डीकर यांनी सकारात्मकताही दर्शवली होती.

Chhagan Bhujbal : ‘त्या’ बैठकीला शरद पवार का आले नाहीत?

आता हर्डीकर यांनी अंतिम केलेली प्रबागरचना महापालिका आयुक्तांच्या मार्फत नगरविकास विभागाकडे सादर केली आहे. नगरविकास विभागाकडून हा अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडून २२ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. त्यावर आयोग अंतिम मान्यता देईल त्यानंतर नागपूर महानगरपालिका ६ ऑक्टोबरपर्यंत अधिसुचनेद्वारे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करेल.

Ordinance : सरकार काढलेल्या ‘त्या’ अध्यादेशा संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोड !

स्थायी समितीचे माजी सभापती पिंटू झलके आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी प्रभाग रचनेवर आक्षेप घेतले होते. कुकडे यांच्या प्रभागात महापालिकेच्या दुसऱ्याच वस्तीचा समावेश करण्यात आला होता. त्यावर त्यांचा आक्षेप होता. तर शहराच्या हद्दीत नसलेला ग्रामीणचा काही भाग आपल्या प्रभागाला जोडल्याची बाब झलके यांनी निदर्शनास आणून दिली होती. यावर हर्डीकर यांनी महानगरपालिका प्रशासनाला खुलासा मागितला होता. या दोन माजी नगरसेवकांच्या आक्षेपांनुसार प्रभाग रचनेमध्ये बदल होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.