Bacchu Kadu : ‘मर किसान, मर जवान’ हा भाजपचा नारा, बच्चू कडूंची टीका

Demand to fix the price of soybean at seven thousand rupees : वेळ आली तर आम्हीच तुमचे कर्ज फेडू, सरकारला डिवचले

Amravati : “आमच्या सोयाबीनला योग्य भाव मिळाला पाहिजे. सात हजार रुपयांचा भाव योग्य आहे, मात्र शेतकऱ्यांना केवळ चार हजार रुपयेच मिळत आहेत. त्यामुळे एका एकराला सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव किती मिळणार हे स्पष्ट का सांगत नाहीत?” असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी केला.

कडू म्हणाले, “आपल्याला हरियाणा–पंजाबप्रमाणे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढावे लागेल. ही जात–धर्माची लढाई नाही. जर आपण एकजूट दाखवली तर भगतसिंगसारखे लढून जिंकता येईल. पण आपण जाती–पातीच्या भांडणांत अडकून राहिलो तर सरकारला काही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांना जर भाव मिळाला, तर आम्ही कर्जमाफी मागणार नाही, उलट तुमचेच कर्ज माफ करू.”

Rakesh Tikait : आत्महत्या करू नका, आंदोलनाचा करंट निर्माण करा

पुढे बोलताना कडू यांनी नेत्यांवर गरीबांना जाणूनबुजून जातीय राजकारणात अडकवून ठेवण्याचा आरोप केला. “जर सरकार भाव देत नसेल तर सत्तेत बसण्याचा अधिकार त्यांना नाही. माझ्या शेतकऱ्याला भाव मिळाला नाही, तर आमदारकी ओवाळून देण्यास मी तयार आहे. २८ ऑक्टोबरला नागपूर येथे मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी त्यासाठी तयारीने उपस्थित राहावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, “जर कर्जमाफी आणि हमीभाव मिळाला नाही, तर लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाऊबीज म्हणून दर महिन्याला १,५०० रुपये पाठवावेत,” अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

Municipal Corporation Election : अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष !

दरम्यान, जळगाव येथे आयोजित जन आक्रोश मोर्चा आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ झाला. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनीच निवेदन स्वीकारावे, अशी मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ती नाकारल्याने उन्मेश पाटील आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील जमावाने पोलिसांचा विरोध झुगारून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून माजी खासदार उन्मेश पाटील, आमदार बच्चू कडू यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.