Guardian Minister stay in the constituency for three days a month : पालकमंत्र्यांनी महिन्याला तीन दिवस मतदारसंघात राहावे
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आयोजित चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना कडक इशारा दिला आहे. “मंत्रीपदावर राहायचे असेल तर कामगिरी दाखवावी लागेल. इतर कामात व्यस्त राहणार असतील, लोकांपर्यंत जाणार नसतील, तर मंत्रीपद सोडावे लागेल,” असे अजित पवार म्हणाले. तसेच पालकमंत्र्यांना दर महिन्याला किमान तीन दिवस आपल्या मतदारसंघात घालवणे बंधनकारक राहील, अशी अट त्यांनी घातली.
या शिबिरात राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, “हे चिंतन शिबिर केवळ निवडणुकांसाठी नाही, तर पुढच्या पिढीसाठी आहे. आज ठोस निर्णय घेऊन आपण ‘नागपूर डिक्लेरेशन’ मांडणार आहोत. पक्षाची ताकद वरून नाही तर तळागाळातून निर्माण होते. प्रत्येक नेत्याने बुथ स्तरावर संवाद साधला पाहिजे, प्रभाग सभा, जनसंवाद शिबिरे, महिला बचतगट बैठक, युवक टाउन हॉल अशा कार्यक्रमांद्वारे पक्ष थेट लोकांच्या जवळ पोहोचला पाहिजे.”
ladki bahin Yojana : लाडकी बहीण’ योजने संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
महायुतीसोबतच्या सहयोगाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “आपण भाजपसोबत कनिष्ठ सहयोगी आहोत. पण महाराष्ट्राच्या विकासासाठी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला नेहमीच मोठं मन दिलं. मी लोकहिताची मागणी केली तर ती कधी नाकारली गेली नाही.”
अजित पवार यांनी आपल्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट करताना सांगितले की, “माझा राजकारणात असण्याचा हेतू सत्तेसाठी नाही, तर लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आहे. गावाला पाणी मिळाले, कारखाना सुरू झाला, रोजगार निर्माण झाले, यांतून मला समाधान मिळते. प्रत्येक रात्री मी स्वतःला विचारतो, आज किती लोकांचे जीवन सुधारले?”
तसेच, पक्षाच्या विचारधारेवर भर देताना अजित पवार म्हणाले, “आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपतो. निवडणुका येत-जात राहतील, पण आपल्या मूलभूत मूल्यांशी तडजोड होऊ नये. संविधान आपले मार्गदर्शक आहे आणि विविधतेतील एकता हेच भारताचे बळ आहे.”
Reservation control : जरांगे समर्थकांना ओबीसींनी धडा शिकवला पाहिजे !
या सर्व वक्तव्यांसह अजित पवारांनी मंत्र्यांना स्पष्ट संदेश दिला “लोकांच्या कामात लक्ष घाला, नियमित मतदारसंघात वेळ द्या, अन्यथा मंत्रीपदाचा त्याग करावा लागेल.”