Rain alert : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस !

Meteorological Department warns, appeals for caution : हवामान खात्याचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

Mumbai : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं मोठं संकट पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, धरणंही ओव्हरफ्लो झाली आहेत. आता भारतीय हवामान विभागाने पुन्हा राज्यासाठी वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून रिमझिमसह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकला आलेले मुंबईकर आणि पर्यटक पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र, पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Narendra Modi : “८०च्या दशकात नरेंद्र मोदींना पहिल्यांदा भेटलो !

रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर आणि मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह मुसळधार सरी कोसळणार आहेत. यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुरूम परिसरात झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले, तर काही घरांत पावसाचे पाणी शिरले. पावसाने रस्ते पाण्याखाली गेले आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Viral clip of Haake : पैशासाठी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाने हाकेंची काढली लाज!

पुण्यात सततच्या पावसामुळे वातावरणात बदल झाला असून, संसर्गजन्य आजार वाढले आहेत. ताप, सर्दी-खोकला, अतिसार यांसह नवजात बालकांमध्ये ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ चा संसर्ग वाढत असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

____