Controversial statement : जास्त चभरेपणा करू नका, मी तुमच्या पक्षाबद्दल बोलतोय…

Sanjay Gaikwads taunts the opposition over ‘that’ statement : ‘त्या’ विधानावर संजय गायकवाडांचा विरोधकांना चिमटा

Buldhana : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन ते तीन कोटी रुपये खर्च करावे लागतात, कधी कधी 100 बोकड सुद्धा द्यावे लागतात, असं वक्तव्य करून वाद ओढवून घेतलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता टीकाकारांना थेट उत्तर दिलं आहे.

विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर प्रतिउत्तर देताना गायकवाड म्हणाले, “मी माझ्या पक्षाबद्दल नाही बोलत, तुमच्या पक्षाबद्दल बोलतोय. जास्त चभरेपणा करू नका.” असं म्हणत त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गट आमदार वैभव नाईक आणि मुंबईच्या माझी महापौर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

‘GST Festival ; :सोमवारपासून भाजपचा ‘जीएसटी बचत महोत्सव’

गायकवाड यांनी आणखी दावा केला की, बुलढाणा तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षातील दोन उमेदवारांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. तसेच, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात लढलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी तब्बल 70 कोटी रुपये खर्च केल्याचाही त्यांनी आरोप केला.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती भाजप–शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढणार की एकत्र, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

GST Savings Festival : सोमवारपासून देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’

यावर बोलताना गायकवाड म्हणाले, “आम्हाला भाजप–शिवसेना युती हवी आहे. विधानसभेला, लोकसभेला युती होते, पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. मग त्यांनी पैसे खर्च करून कशाला मातीत जायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गायकवाड यांच्या या विधानामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे.