Uddhav Thackerays request to Chief Minister Fadnavis : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांना हात जोडून विनंती
Mumbai : राज्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक भागांत शेतकरी संकटात सापडले आहेत. शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झालेलं असताना उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. “मुख्यमंत्र्यांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” अशी हात जोडून विनंती ठाकरे यांनी केली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना भेटून परतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या दोन-तीन वर्षांतील १४ हजार कोटींची जाहीर केलेली मदत अजून पोहोचलेली नाही. २०१७ च्या कर्जमाफीचीही शेतकरी वाट पाहत आहेत. आमच्या सरकारच्या काळात आम्ही कर्जमुक्ती केली आणि संकट आलं तेव्हा पंचांग काढून बसलो नाही. मला यात राजकारण आणायचं नाही, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे.”
Makrand Patil : विरोधकांच्या दबावानंतर पालकमंत्री पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करत ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्याने मदतीबाबत प्रश्न विचारला तर मुख्यमंत्री त्याला म्हणतात, ‘राजकारण करू नकोस’. एवढंच नव्हे तर त्याच्या मागे पोलिसही लावले जातात. ही कसली लोकशाही? कसला कारभार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Vidarbha Farmers : हंगामी पिकांचे कंबरडे मोडले, शेतजमीन खरडली
शेतकऱ्यांच्या वतीने केलेल्या मागण्या सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून सांगतो शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. त्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने जाहीर करा आणि कालबद्ध पद्धतीने वाटप करा. तसेच बँकांकडून येणाऱ्या नोटिसा थांबवा.” अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
____