Agri Pumps for All in Western Maharashtra Why Not for Vidarbha’s Farmers : वीज कनेक्शनसाठी डिमांड भरूनही त्यांचे चेक परत का करण्यात येत आहेत?
Chandrapur : कृषी पंप हा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे, नव्हे विदर्भातील प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे. विदर्भाचा अनुशेष १ लाख २६ हजारांहून अधिक आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागेल त्याला कृषी पंप देण्यात आले. आता विदर्भातील शेतकऱ्यांनाही कृषी पंप मिळाले पाहिजेत. हा त्यांचाही हक्क आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क पूर्णपणे दिले जाणे आवश्यक आहे, असे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे कृषी पंप वीज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, मी अर्थमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू केली. या योजनेद्वाले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याच्या समितीचा मी अध्यक्ष होतो. तेव्हा आग्रहाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट केला.
Sudhir Mungantiwar : पोंभूर्णा होणार राज्यातील आदर्श तालुका !
शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती हा मजबुरी नव्हे, तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा, यासाठी जे काही प्राधान्याने करता येईल, ते प्राधान्याने करण्याचा निर्धार आहे. आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी डिमांड भरले असूनही विभागाकडून त्यांचे चेक परत करण्यात येत आहेत. मात्र हे चेक परत करण्याचे कारण मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगता आले नाही. यामागचे कारण शोधावे लागेल, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.
शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यासाठी सात हजार मेट्रीक टन युरीया खताचे आवंटन करण्यात आले. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पहिल्यांदाच कोरोमंडल कंपनीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून लढण्याचा ठाम निर्णय मी घेतला आहे. पोंभूर्णा तालुक्यातील सात शेतकऱ्यांना राज्य कृषी पुरस्कार प्राप्त झाला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार मुबलक युरीया, मुनगंटीवारांनी दिले निर्देश !
जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास इतका आदर्श असावा की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हटले पाहिजे की, ‘खेती करने का तरीका हो तो बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ के किसानों जैसा हो’ कृषी पंप वीज जोडणीच्या प्रबंलित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वतःच्या हक्काची जाणीव ठेऊन शेतकरी या ठिकाणी सहभागी झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावे, यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.