Vidarbha Farmers : पीक कर्जमाफीचे आश्वासन ‘थकीत’, शेतकऱ्यांवर हजारो कोटींचे ओझे!

The government did not keep its promise of crop loan waiver : कर्जाची रक्कम गेली १०६५ कोटींवर, बँकांकडे पत संपली

Buldhana विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतरही हे आश्वासन अद्याप अपूर्ण आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाची रक्कम तब्बल १०६५ कोटींवर गेली असून, सरकारच्या विलंबामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत.

बँकांकडून कर्ज पुनर्गठन न झाल्याने शेतकऱ्यांना सावकारांकडून उधारी घेऊन पेरणी करावी लागली. मात्र सलग अतिवृष्टी, ढगफुटी व संततधार पावसामुळे हंगामच वाया गेला. यामुळे जिल्ह्यातील कृषी कर्जाचा एनपीए १४७० कोटींवर पोहोचला आहे. यात फक्त पीककर्जाचा आकडा १०६५.५६ कोटी आहे.

Asaduddin Owaisi : खा. असदुद्दीन ओवेसी कोल्हापूर दौऱ्यावर, वातावरण तापले !

जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. आतापर्यंत ३ लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली असून, नुकसानीची व्याप्ती अजून वाढत आहे. या परिस्थितीत शेतकरी पुन्हा सावकारांच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत.

नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या सहपालकमंत्री संजय सावकारे यांना शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या दौऱ्यातही शेतकरी संतप्त झाले होते. शेती खरडून जाणे, पिके वाहून जाणे व शेतात पाणी साचल्याचे दृश्ये जनतेला हृदयद्रावक ठरत आहेत.

कर्जमाफीसंदर्भात सहकार विभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा बँकांना सरकारकडून कोणत्याही अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि अस्वस्थता वाढत आहे.

Local Body Elections : चुकीने काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले तर… बावनकुळेंना भीती !

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर टीका करताना म्हटले – “महायुती सरकारने वचन दिले होते, ते पाळले पाहिजे. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी हीच खरी गरज आहे. उद्योगपतींची कर्जे माफ होतात, मग शेतकऱ्यांची का नाहीत? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”