Pigeon pea, maize, and cotton devastated, farmers in crisis : बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; मनसेने केली मदतीची मागणी
Buldhana राज्यातील आणि विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे बळीराजा हतबल झाला आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने धुमाकूळ घालत तब्बल ३२२ गावे अतिवृष्टीग्रस्त घोषित झाली असून, ६४ हजार ४७३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी सरकारकडे तात्काळ कर्जमाफी जाहीर करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात रिंढे पाटील यांनी सांगितले की, यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ९२ पैकी तब्बल ७१ महसूल मंडळ अतिवृष्टीग्रस्त झाली आहेत. म्हणजेच जिल्ह्याच्या ७७ टक्के महसूल क्षेत्रावर अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यामध्ये ५५ मंडळात १ ते ३ वेळा, १२ मंडळात ४ ते ५ वेळा, तर ४ मंडळात तब्बल सहा वेळा ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याचे त्यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : मोताळ्यात तहसीलदारच नाही, नागरिकांना होतोय त्रास
अतिवृष्टीसोबतच हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन, तूर, मका, कापूस, भाजीपाला आणि फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे श्रम, गुंतवणूक आणि आशा पाण्यात गेल्याचे चित्र समोर आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : शेतकरी हवालदील, ठाकरे गटाचे तहसीलपुढे धरणे आंदोलन
या पार्श्वभूमीवर मनसेने सरकारला इशारा देत शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही रिंढे पाटील यांनी दिला आहे.