Joint police operation proved futile : मुंबई, नागपूर व अमरावती पोलिसांची संयुक्त कारवाई ठरली फोल, नामसाधर्म्यामुळे गोंधळ
Amravati कॅनडाने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर परतवाड्यात दडल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचकडून अमरावती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई, नागपूर व अमरावती पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान परतवाड्यातील ब्राह्मणसभा व खापर्डे प्लॉट परिसरात मोठी छापेमारी केली. या कारवाईत एकूण १३ जणांना ताब्यात घेण्यात आले.
मात्र चौकशीत ते सर्वजण गरीब व्यावसायिक निघाले. कोणाचाही बिश्नोई गँगशी संबंध आढळला नाही. नामसाधर्म्यामुळेच सारा गोंधळ झाल्याचे शुक्रवारी रात्री अमरावती पोलिसांनी स्पष्ट केले आणि तब्बल २४ तास रंगलेल्या या नाट्याला शेवटी पूर्णविराम मिळाला.
Gram Rozgar Sahayak : जी.आर. काढूनही अंमलबजावणी नाही; ७ महिन्यांचे मानधन थकले
या छापेमारीदरम्यान परिस्थिती ताणली गेली. मुंबई क्राईम ब्रँचने स्थानिक पोलिसांना, “गँगचे सदस्य पोलिसांवर हल्ला करू शकतात,” अशी सूचना दिल्याने वातावरण गंभीर झाले. सबब, एलसीबी प्रमुखांनी स्वसंरक्षणार्थ ब्राह्मणसभा भागात हवेत वॉर्निंग फायर केला.
तेथून नऊ जण आणि खापर्डे प्लॉटमधून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दावा केला होता की यामध्ये बिश्नोई गँगचा शार्प शूटर आहे. मात्र, उशिरापर्यंत चौकशी करूनही कोणतेही गँग कनेक्शन आढळले नाही.
गुरुवारी रात्री १०.३० वाजता नागपूर व अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित इसम राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकला. दरवाजा उघडण्याची सूचना दिल्यानंतरही संशयित सैरावैरा पळू लागले. त्यावेळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ हवेत एक वार्निंग शॉट केला.
Local Body Election : पहिले नगर परिषद, नंतर जिल्हा परिषद निवडणूक
मुंबई गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी सकाळी परतवाड्यात दाखल झाले. चौकशीत स्पष्ट झाले की मुंबई पोलिसांना हवा असलेला आरोपी आणि ताब्यात घेतलेल्यांपैकी एकाचे नाव सारखे असल्याने गोंधळ उडाला होता.