Mahayuti Politics : शिंदेंच्या योजनांना का लावला जातोय चाप ?

Why Are Eknath Shinde’s Schemes Being Restrained : ‘आनंदाचा शिधा’, ‘माझी शाळा – सुंदर शाळा’लाही नाही मिळाला मुहूर्त

Mumbai : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात काही लोकप्रिय योजना सुरू केल्या होत्या. त्यांपैकी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना वगळता इतर सर्व योजनांना चाप लावण्यात येत आहे. त्यांच्या महत्वाकांक्षी ‘आनंदाचा शिधा’ या योनजेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही आणि त्यांनीच सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या बहुचर्चित योजनेलाही मुहूर्त मिळालेला नाही. शिंदेंच्याच योजना का बंद पाडल्या जात आहेत, असा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ ही योजना आनंदाच्या शिधाप्रमाणे एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना होती. शाळांचा सर्वांगिण विकास करणे, आधुनिकीकरण करणे आणि शाळांचे सौदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केली होती. त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी ही योजना एक आहे. ही योजना सुरू न झाल्यामुळे विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. ‘सुरू झालेली प्रत्येक योजना पुढे सुरू राहिलच, असे काही निश्चित नाही’, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

Mahayuti Politics : शिंदेंच्या योजनांना का लावला जातोय चाप ?

लाडक्या बहीणीचा फटका ?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली होती. ही योजना आताही सुरू आहे अन् तेवढीच चर्चेत आहे. या योजनेसाठी सरकारकडे निधी अपुरा पडतो आहे. त्यामुळे इतर योजनांचा निधी ‘लाडकी बहीण’ साठी वापरला जात असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण’चा फटका तर ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ योजनेला बसला नाही ना, या प्रश्नाचे उत्तर मंत्रालयातच शोधले जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शितयुद्ध सुरू आहे. त्यामुळेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ बंद पडणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात आली आहे.