Vote theft : भाजपने मतचोरी करून विजय मिळवला, युवक काँग्रेसचा हल्लाबोल

Criticism of Election Commission Through Signature Campaign : चिखलीत स्वाक्षरी मोहिमेद्वारे निवडणूक आयोगावर निशाणा

Chikhli : “देशातील निवडणूक आयोगाने निष्पक्षतेचा कणा गमावला आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून मतचोरी केली आणि त्यातूनच त्यांचा विजय शक्य झाला,” असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर, आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मतचोरीविरोधात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेला युवक काँग्रेसकडून राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चिखली येथे १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने ही मोहीम पार पडली. या वेळी राष्ट्रीय सचिव व युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी नवज्योतसिंग संधू यांनी भाजपवर तीव्र टीका करत म्हटले,
“भाजप लोकशाहीच्या पायावर गदा आणत आहे. युवक काँग्रेसने मतचोरीविरोधात रान पेटवावे — ही लढाई मतदान हक्क व लोकशाहीच्या सन्मानाची आहे.”

Opponent aggressive : मतदार याद्यांतील घोळ, दुबार मतदानावर विरोधक आक्रमक !

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात आवाज उठवला.

या वेळी प्रदेश महासचिव कपिल ढोके, जिल्हा प्रभारी श्रीहरी इंगोले, प्रवक्ते व प्रदेश सचिव विश्वदीप पडोळ, प्रदेश सचिव शिवराज पाटील, कुणाल बोंद्रे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आंबादास वाघमारे, शहराध्यक्ष रिकी काकडे, जय बोंद्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Local Body Elections : सभापतीपद एसटीसाठी राखीव, पण सदस्यांमध्ये एकही एसटी जागा नाही!

बैठकीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युवकांमधून नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांच्या उत्साही उपस्थितीने बैठकीत जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.