Dattatreya Bharane active; said No one will leave : दत्तात्रय भरणे सक्रिय; म्हणाले “कोणीही सोडून जाणार नाही”
Solapur : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या चर्चांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी टेंभुर्णी येथे पक्ष पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन संवाद साधला. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भरणे यांनी पक्ष सोडण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
“मी इंदापूरमध्ये अजितदादांना सोडून गेलो तरी त्यांना काही फरक पडला नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी असंतुष्ट नेत्यांना सूचक संदेश दिला. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील माजी आमदार राजन पाटील (मोहोळ), यशवंत माने, दीपक साळुंखे (सांगोला) आणि बबन शिंदे (माढा) हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या हालचाली सुरू आहेत. या नेत्यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Congress Agitation : ऐन दिवाळीच्या तोंडावर काँग्रेस धडकली महानगरपालिकेत !
त्यामुळे गटात खळबळ उडाली असून, हा संभाव्य “डॅमेज कंट्रोल” करण्यासाठीच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर दौऱ्यावर आल्याची चर्चा आहे. मात्र, भरणे यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, “मी केवळ संवादासाठी आलो आहे, डॅमेज कंट्रोलसाठी नाही.” तरीही, “महाराजांची भेट घेऊन समजूत घालणार आहे,” असे ते म्हणाले, ज्यामुळे त्यांच्या भेटीमागचा उद्देश स्पष्ट झाला.
Excise duty revenue : उत्पादन शुल्क विभागाचा विक्रमी महसूल १२,३३२ कोटींची कमाई!
या प्रसंगी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, “अजित पवार गटात अनेक इच्छुक आहेत. योग्य वेळी त्यांना प्रवेश दिला जाईल. अजितदादांचं सोलापूर जिल्ह्यावर खूप प्रेम आहे आणि जिल्ह्यातील नेतेही त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात. त्यामुळे कोणीही पक्ष सोडून जाणार नाही, असा माझा विश्वास आहे.”
सोलापूरमधील या घडामोडींनी राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण केली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर ही गळती महायुतीतील समीकरणांवर परिणाम करू शकते, असे संकेत राजकीय वर्तुळातून दिले जात आहेत.
______