Vidarbha Farmers : शेतकऱ्यांची ‘काळी दिवाळी’, कर्जमाफीसाठी अनोखे आंदोलन

Farmers Demand Fair Prices for Agricultural Produce : शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी, सरकारचा केला निषेध

Akola सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत, हमीभावानुसार शेतमाल खरेदी यांसारख्या मागण्यांसाठी क्रांतिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अकोल्यात काळी दिवाळी साजरी करण्यात आली. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत उतरून नागरिकांशी संवाद साधला.

निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी, घटते उत्पादन, वाढता उत्पादन खर्च, खासगी सावकारांचे कर्ज आणि वित्तीय संस्थांचा ताण यामुळे शेतकरी आत्महत्येकडे ढकलले जात आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतमालाचे उत्पादन घटले आहे. त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे वाढत आहे आणि तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.

Randhir Sawarkar Amol Mitkari : आमदार सावरकर शेतकऱ्यांच्या टार्गेटवर!

यंदा तरी सरसकट कर्जमाफीसह ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी आंदोलन करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, तालुकाध्यक्ष मंगेश गावंडे, सुनील इंगळे आदी पदाधिकारी सहभागी झाले.

अलीकडेच राज्य सरकारने ३६ हजार ५०० कोटी रुपयांचे कृषी पॅकेज जाहीर केले. मात्र हे पॅकेज केवळ दिशाभूल करणारे असून प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी रोडवर आंदोलन केले. अंगावर फलक परिधान करून शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला. सोयाबीन व इतर कडधान्य घेऊन बाजारपेठेत उतरलेल्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. या अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

Bacchu Kadu : मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही विदर्भावर अन्याय

दिवाळी खरेदीसाठी बाजारात गर्दी असतानाच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत शेतकऱ्यांची व्यथा पोहोचवली. काही शेतकऱ्यांनीही बाजारातील दरावर असमाधान व्यक्त केले. “सोयाबीनचा दर केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल मिळत आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचे गणितच जुळत नाही. वर्षभराच्या खर्चासाठी पैसा कोठून आणायचा?” असे प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले.