Local Bode Elections : बुलढाण्यातील नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘हायप्रोफाईल’!

Mayor Election in Buldhana Considered ‘High-Profile’ : शिंदेसेना-भाजपात तोंडी युती की स्वबळावरची चुरस?

Buldhana नगरपालिका निवडणुकीचे वारे सुरू होताच बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे शिंदेसेना व भाजपकडून स्वबळाची तयारी सुरू असतानाच दोन्ही पक्षांत तोंडी महायुतीची चर्चा सुरू आहे. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत युतीचा तोल कोणत्या दिशेने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक ‘हायप्रोफाईल’ होणार असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्ट संकेत मिळत आहेत.

गेल्या निवडणुकीत तब्बल आठ उमेदवार रिंगणात उतरल्याने मतविभाजनाचा फटका शिंदेसेनेला बसला होता, तर भाजपलाही अपेक्षित निकाल लागला नव्हता. यावेळी दोन्ही पक्ष ही चूक पुन्हा टाळतील का, की पुन्हा जुनीच रणनीती नव्या रंगात खेळली जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Local Body Elections : आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला!

भाजपकडून जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे कोणती चाल खेळतात, याकडे पक्षांतर्गत वर्तुळातही उत्सुकतेने पाहिले जात आहे. निष्ठावान पदाधिकाऱ्याला नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळते का, की नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवला जातो, हा भाजपसाठीचा निर्णायक प्रश्न आहे. सध्या सिंधुताई खेडेकर व सरला बाहेकर ही नावे चर्चेत आहेत.

तर शिंदेसेनेकडून अद्याप अधिकृत नाव घोषित झाले नसले, तरी आ. संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा त्यांच्या विश्वासातील महिला उमेदवार मैदानात उतरू शकतात, अशी चर्चा आहे. दरम्यान, बुलढाणा नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याने स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. काँग्रेसने अद्याप पत्ते उघडलेले नाहीत, मात्र ही लढत हायप्रोफाईल स्वरूपाची असेल, हे निश्चित मानले जात आहे.

बुलढाण्यात १ जुलै २०२५ रोजी मतदारसंख्या ६९ हजार ३५ इतकी आहे. मागील निवडणुकीत मतदानाचा टक्का ५४.३९ टक्के नोंदवला गेला होता. त्यामुळे विजयी उमेदवाराला साधारणतः ३२ टक्क्यांच्या आसपास मते मिळवावी लागतात. गत निवडणुकीत नजमुन्नीसा बेगम यांनी ३० टक्के मते मिळवून विजय मिळवला होता, तर पूजा गायकवाड (शिवसेना) यांना २७.४० टक्के आणि कुंदा पाटील (भाजप) यांना १८.७१ टक्के मते मिळाली होती.

Local Body Elections : मेहकर नगरपरिषद मतदार यादीत मृतांची नावे कायम!

या पार्श्वभूमीवर भाजपचा वाढता जनाधार, शिंदेसेनेची संघटनशक्ती, तसेच काँग्रेसचा गुप्त डाव — या सर्वांच्या एकत्रित समीकरणातून बुलढाण्याची ही निवडणूक राजकीयदृष्ट्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.