Satyacha morcha : मतचोरीविरोधात मनसे सह महाविकास आघाडीचा ‘सत्याचा मोर्चा’

Fashion Street, Metro Cinema attacked on Municipal Corporation : फॅशन स्ट्रीट, मेट्रो सिनेमा मार्गे महापालिके वर धडकणार

Mumbai : निवडणुकीतील मतचोरी, मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर आरोप करत महाविकास आघाडीचा ‘सत्याचा मोर्चा’ मुंबईत 1 नोव्हेंबर रोजी निघणार आहे. या मोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे आणि डावे पक्ष या सर्वांनी एकत्र येत या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

या मोर्चाची माहिती देताना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले, “मतदार यादीतील गोंधळ, मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात हा सत्याचा मोर्चा आहे. लोकांना सत्य कळावे आणि मतचोरीमागील कारस्थान उघड व्हावे, यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय.”

Doctor suicide case : कधी? आणि किती वेळा? पोलीसच भक्षक बनल्याचा आरोप

मोर्चा 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणार आहे. मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत हा मोर्चा जाणार असून, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संपवला जाणार आहे. “मुंबईकरांना गैरसोय होऊ नये म्हणून दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा नियोजित केला आहे,” असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

या मोर्चात राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्व प्रमुख विरोधी नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले, “काँग्रेस पक्षाचा मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेसमुळेच मतचोरीला वाचा फुटली आहे. आमचे वरिष्ठ नेतेही या मोर्चात सहभागी होतील.”

Forged signature : थेट अजित पवारांची बनावट सही करून शिक्का मारला!

अनिल परब यांनी पुढे सांगितले की, “मोर्चासाठी पोलिसांशी चर्चा झाली असून, मार्ग निश्चित करण्यात आला आहे. लोकांना सोयीसाठी क्यूआर कोडद्वारे माहिती दिली जाणार आहे. मुंबईबाहेरून येणाऱ्यांसाठी वाहनव्यवस्था ठेवण्यात आली आहे.”

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत अनिल परब म्हणाले, “आम्ही मतचोरीचा बारकाईने अभ्यास करतोय. मतदार यादीतील घोळ दूर करा. आमच्या आक्षेपांवर न्याय मिळाला पाहिजे. चोक्कलिंगम यांनी जे सांगितले, त्यावर आम्ही अभ्यास करत आहोत.”

Navneet Rana : माझ्याकडे 50 जणांची गँग, तुझ्यावर सामूहिक अत्याचार करून मारून टाकू!

दरम्यान, एनसीपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं, “चोर चोऱ्या करणार आणि आमच्यावर गुन्हे दाखल करणार. रोहित पवारांवर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल केला, पण ते घाबरणारे नाहीत. हा गांधी – नेहरूंचा देश आहे, आम्ही मागे हटणार नाही.”

1 नोव्हेंबरचा ‘सत्याचा मोर्चा’ हा राज्यातील विरोधी पक्षांच्या एकत्रित शक्तीचे प्रदर्शन ठरणार असून, मतदार यादीतील घोळ आणि निवडणुकीतील पारदर्शकतेवर नव्याने चर्चा पेटवणारा ठरणार आहे असे सांगण्यात येत आहे.

_____