MNS office bearers’ gathering : निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा स्फोटक आरोप, म्हणाले…

Raj Thackeray’s explosive allegation against the Election Commission : आज निवडणुका म्हणजे गुप्त व्यवहारांचा खेळ

Mumbai : महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी पुन्हा एकदा घणाघाती प्रहार केला. ‘मतदार याद्या स्वच्छ झाल्यानंतर जर सत्ताधाऱ्यांचा विजय झाला, तर तो आम्हीही मान्य करू. पण आज निवडणुका लपवाछपवीने घेतल्या जात आहेत. सगळं मॅच फिक्सींग आहे. आज निवडणुका म्हणजे गुप्त व्यवहारांचा खेळ झालेला आहे’, असं स्फोटक वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

मुंबईतील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, क्रिकेडमध्ये जेव्हा मॅच फिक्सींग झालं होतं, तेव्हा आजहरउद्दीन, अजय जडेडा यांच्यासारख्या खेळाडुंना बाहेर काढलं गेलं होतं. पण निवडणुकांमधील मॅच फिक्सींग समोर आलं तरी कुणालाच काहीही झालेलं नाही. सगळे रोजरोसपणे वावरत आहेत. आता निवडणुका म्हणजे पारदर्शक लोकशाही नव्हे, तर प्रायव्हेट सिस्टीम झाल्या आहेत.

Uddhav – Raj Thackeray meeting : भेटी मोजताहेत, आता तर मीही कंटाळलो, राज ठाकरेंचा टोला !

मुख्य निवडणूक आयुक्त सांगतात की सीसीटीव्ही फुटेज प्रायव्हेट आहेत. कसली आली प्रायव्हसी? मतदाराने दिलेलं मत हे गुप्त असू शकतं. पण मतदार कोण आहे, हे तर सर्वांनाच माहिती असतं. मग ही गुप्ततेची ढाल का दाखवली जाते, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला. जे पचत नाही, जे पटत नाही, अशी उत्तरं दिली जातात. घोळ करून निवडून येतात. अन् मग मन मानेल तसं वागतात. हे कुठवर चालणार? स्वाभिमान आपण कितीदा गहाण ठेवायचा, यालाही काही मर्यादा हव्यात की नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

Mumbai shook : चित्रपटात कामाचं आमिष दाखवून 17 चिमुकल्यांना डांबून ठेवलं !

राज ठाकरे यांच्या या स्फोटक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. राज ठाकरे यांच्या भाषणादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना समर्थन दिलं आणि मतदार याद्या स्वच्छ करा, मगच निवडणुका घ्या, अशा घोषणा दिल्या.