Breaking

Sports authority of India : संचालक अचानक धडकले अन् तारांबळ उडाली!

 

The sports director on surprise visit to the office : खेलो इंडिया प्रशिक्षकांना निम्म्या मानधनाचा प्रकार

Wardha खेलो इंडिया उपक्रमात प्रशिक्षकाला देण्यात येणाऱ्या मानधनात अनियमितता आढळून आली. शिवाय नियुक्ती असताना कार्यमुक्त करणे, मानधन रोखून ठेवणे आदीं विषय चर्चेचे ठरले होते. त्याची दखल घेत सोमवारी नागपूर क्रीडा विभागाचे संचालक जिल्हा क्रीडा विभागात धडकले. दुपारपासून प्रकरणाची सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत चालल्याची माहिती आहे.

केंद्र शासन भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंना प्राथमिक स्तरावरील क्रीडा प्रशिक्षण यांच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात हे केंद्र २०२१ पासून सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रति केंद्राच्या प्रशिक्षकास २५ हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे वर्षाला ३ लाख रुपये मानधन तसेच क्रीडा साहित्य, क्रीडा गणवेश व इतर किरकोळ खर्चाकरिता दोन लाख असा पाच लाख रुपये खर्च करण्याचे निर्देश आहे.

Sonam Wangchuk : अनुभवातून मिळतं तेच खरं शिक्षण

असे असताना त्रयस्थ संस्थेमार्फत निम्म्या मानधनावर नियुक्ती, एका प्रशिक्षकाच्या नियुक्तीचे आदेश आहेत. मात्र सहाय्यक प्रशिक्षकाची नियुक्ती, क्रीडा साहित्य खरेदीत वाढीव बिल काढण्यासह अन्य प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. अखेर संचालकांनी सोमवारी वर्धा क्रीडा विभाग गाठले. प्रकरणाची झाडाझडती घेत प्रत्येक फायलींची बारकाईने चौकशी करण्याच्या त्यांना सूचना असल्याने दुपारी २ वाजतापासून सुरू असलेली चौकशी सायंकाळी उशिरापर्यंत चालल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nitin Gadkari : वीरांच्या गौरवासाठी व्यासपीठावरून खाली उतरले नितीन गडकरी !

काय आहे प्रकरण?
जिल्ह्यात खेलो इंडिया उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षकांना मिळणारे मानधन हा एक गंभीर विषय बनला आहे. केंद्र शासनाच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेळाडूंना प्राथमिक स्तरावरील क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी खेलो इंडिया केंद्रे स्थापित केली आहेत. या केंद्रांमध्ये प्रशिक्षकांना प्रति महिना 25000 रुपये मानधन देण्याचे निर्देश आहेत. परंतु वर्धा जिल्ह्यात हे मानधन निम्मे दिले जात आहे. यामुळे प्रशिक्षक आणि पालकांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संचालकांची अचानक भेट महत्त्वाची मानली जात आहे.