Breaking

MLA Manoj Kayande : ३० वर्षांत सिंदखेडराजात कामेच झाली नाहीत!

In 30 years no development has been done in Sinadkhed Raja : चेहरामाेहरा बदलविणार असल्याचा आमदार कायंदेंचा दावा

Buldhana जनतेच्या समस्यांची जाणीव असल्यामुळे जनतेने आमदार म्हणून निवडून दिले आहे. अनेक वर्षे जनतेतील आमदार मिळाला नव्हता. त्यामुळे मतदारसंघात विकासकामेच झाली नाहीत. गेल्या ३० वर्षांत काहीच काम झाले नाही. माझ्या वयाएवढाच बॅकलॉग या सिंदखेडराजा मतदार संघात दिसतोय, अशी टीका आमदार मनोज कायंदे यांनी केली.

आता जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहेत. यापुढे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काम करणार आहे, असंही कायंदे म्हणाले. दुसरबीड येथे नवनिर्वाचित आमदार मनोज कायदे यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी होते. तर माजी आमदार तोताराम कार्यदे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, विष्णू मेहेत्रे, माजी उपसभापती श्याम जाधव, संतोष खांडेभराड यांची प्रमुख उपस्थिती होती.

Amravati Municipal corporation : आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय मिळत नाहीत दाखले !

सुतगिरणी, साखर कारखाना महत्त्वाचे विषय
मतदारसंघातील जिजामाता सहकारी कारखाना, साखरखेर्डा येथील सूतगिरणी हे तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारखान्यासंदर्भात पुढच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बैठक लागली आहे. त्यात कारखाना सुरू करण्यासाठी काय तो निर्णय घेता येईल. परंतु, कारखाना प्रशासनाने स्थानिक रोजगारांना रोजगार दिला पाहीजे. यासाठीच माझा आग्रह कारखाना प्रशासनाला आहे, असेही कायंदे यांनी सांगितले.

Nagpur Traffic Police : वाहतूक पोलिसांचे ‘फुटपाथ खाली करो’

कायंदे २० दिवसांत झाले आमदार : नाझेर काझी
मी अजित पवार यांना शब्द दिला. तुम्ही मनोज कायंदेला आमदाराकीचे तिकीट द्या. मी त्यांना निवडून आणतो. परंतु, विरोधकांनी तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती दिली. मतदारसंघात वेगळा निकाला असता तर आमच्यासह इतरांचे अस्तित्व कायम संपले असते. परंतु, कायंदे यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने ते फक्त वीस दिवसात आमदार झाले, असे अॅड. नाझेर काझी यांनी सांगितले.