Expert suggestion for fast implementation of the project : प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांची सूचना
Akola बहुप्रतीक्षित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने पावलं उचलण्यात आली आहेत. प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांनी सूचनादेखील दिल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील सिंचनाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे एक मोठी आशा निर्माण झाली आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील सहा जिल्ह्यांतील ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू होईल. या पार्श्वभूमीवर, प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यास त्याच्या जलद अंमलबजावणीस मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यास प्रकल्पासाठी ९० टक्के निधी मिळण्याची शक्यता आहे.
MNS leader Amol Patil : पीक कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांची खैर नाही
देशात ज्या सिंचन प्रकल्पामुळे दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण होऊ शकते, अशा प्रकल्पांना राष्ट्रीय दर्जा दिला जातो. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे पावणे चार लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन होईल. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
राष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून ९० टक्के निधी मिळविण्याचा मार्ग खुला होतो. राज्यावर सात लाख कोटी रुपये कर्ज असल्याच्या पार्श्वभूमीवर, अशा आर्थिक स्थितीत वैनगंगा-नळगंगा प्रकल्पावर ८६ हजार कोटी रुपये खर्च करणे कठीण होऊ शकते, असे तज्ज्ञांनी नमूद केले.
Preparation for by-elections of Gram Panchayats : ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू
तज्ज्ञांचा इशारा
वेळेवर निधी उपलब्ध झाला नाही, तर प्रकल्पाच्या खर्चात प्रचंड वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंदाजे दहा वर्षांत प्रकल्प पूर्ण झाला नाही, तर खर्च २.५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळविण्याचे प्रयत्न सुरु करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.