MLAs request Chief Minister, Agriculture Minister for extension of date for purchase of soybeans : शेतकऱ्यांना करावा लागतोय तांत्रिक अडचणींचा सामना
Akola सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी, अशी मागणी भाजप प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सादर केलेल्या निवेदनातून ही मागणी केली.
शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन अद्याप खरेदीसाठी शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील २८,९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तरी फक्त १५,२४३ शेतकऱ्यांनीच विक्री केली आहे. अजूनही १३,६५९ शेतकऱ्यांचे (४७%) सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे.
Letter to principal secretary : निकृष्ट भोजन पुरविणाऱ्यांचे कंत्राट रद्द करा
अकोला जिल्ह्यासाठी शासनाने ६.५८ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे लक्ष ठेवले होते. २१ जानेवारी २०२५ पर्यंत ५.८९ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.
मात्र, ६९,००० क्विंटलचे लक्ष्य अद्याप पूर्ण व्हायचे आहे, आणि शेतकऱ्यांकडे अजून २.५० ते ३.०० लाख क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षेत आहे.
Animea prevention : बाय बाय अॅनिमिया! आजार रोखण्यासाठी देशभर फिरणार बस
सोयाबीन खरेदी प्रक्रियेमध्ये उशीर आणि तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत निश्चित केलेली सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत वाढवून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावी, अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली.
संबंधित उपाययोजना
खरेदीचे लक्ष ३.०० लाख क्विंटलपर्यंत वाढवावे. अडचणींमुळे शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये यासाठी सहकार सचिव व पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला आहे.