NCP leaders joined BJP : चिखलीत महाविकास आघाडीत फूट
Buldhana राज्यभरात महायुतीने संघटित राहून विधानसभेत मोठे यश संपादन केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर चिखलीतील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संजय गाडेकर आणि त्यांच्या पत्नी, तेल्हारा ग्रामपंचायतीच्या सरपंच किरण गाडेकर, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर सोळंकी, काँग्रेसचे चिखली शहर कार्याध्यक्ष निलेश अंजनकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
MLA Siddharth Kharat : काम करायची इच्छा नसेल तर तुमचा मार्ग मोकळा
विधानसभा निवडणुकीत आमदार श्वेता महाले यांनी विरोधकांना पराभूत करून सलग दुसऱ्यांदा आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली आहे. विरोधकांनाही त्यांच्या नेतृत्वाची दखल घ्यावी लागली आहे. यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे पदाधिकारी भाजपाकडे आकर्षित होत असल्याचा दावा स्थानिक भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
या सोहळ्यात गाडेकर दाम्पत्य, निलेश अंजनकर, किशोर सोळंकी यांच्यासह काँग्रेसचे माजी सरपंच नितीन म्हस्के, समाधान म्हस्के, जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव गिऱ्हे, शिवसेनेचे सरपंच विनोद कणखर, प्रवीण पाटील, ज्योती गायकवाड, पंढरीनाथ गावंडे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
Chikhli Congress : निवडणूक आयोगाने निःपक्ष निवडणुका घ्याव्यात
भाजपात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील. त्यांच्या अनुभवाचा आणि ताकदीचा उपयोग पक्षवाढीसाठी होईल. चिखलीतील विकासाची गती वाढवण्यासाठी भाजप पूर्ण सहकार्य करेल, असं बावनकुळे म्हणाले.
आमदार श्वेता महाले यांनी पक्षात सामील झालेल्या नव्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. भाजपात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मान आणि संधी दिली जाईल. हे सहकारी राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनुभवसंपन्न आहेत आणि त्यांच्या योगदानाने पक्ष अधिक मजबूत होईल, असं त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. आघाडीतील फूट चिखलीत उघड झाली आहे. भाजपाने मात्र चिखलीतील आपले संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.