Breaking

Directorate of revenue Intelligence DRI : बिबट्याची कातडी जप्त, तीन तस्करांना अटक!

Leopard skin seized, three smugglers arrested : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई; आरोपी अकोला वनविभागाच्या ताब्यात

Akola बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अकोट तालुक्यातील जंगलामध्ये केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे येथील पथकाने अटक केली. या कारवाईत ८०.५ इंच बाय २५ इंच आकाराची बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी अकोट व अकोला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

डीआरआयच्या पुणे पथकाला अकोला जिल्ह्यात काही व्यक्ती बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने अकोट तालुक्यातील जंगलात सापळा रचला. सतर्कतेने राबविलेल्या या कारवाईदरम्यान तीन आरोपींना अटक करण्यात आली. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार बिबट्याचा शिकार आणि कातडी व अन्य अवयवांची तस्करी हा गंभीर गुन्हा आहे. बिबट्या अधिनियमाच्या अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असल्यामुळे त्यावर कठोर कारवाई केली जाते.

Nagpur Police : नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

या कारवाईत पकडलेल्या तिघांमध्ये दोन वाहक आणि एका मध्यस्थाचा समावेश आहे. त्यांच्याकडून ८०.५ इंच लांब आणि २५ इंच रुंद अशा आकाराचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले. आरोपींना अकोला जिल्हा वनविभागाकडे पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालय हे केंद्र सरकारच्या वित्त विभागांतर्गत कार्यरत आहे. विविध प्रकारच्या बेकायदेशीर व्यापारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करते.

जीएसटी विभागासोबत समन्वय राखला जातो. वन्यजीवांच्या तस्करीविरोधातील कारवायाही प्रभावीपणे पार पाडल्या जातात. अकोला जिल्ह्यातील ही कारवाई त्याच प्रयत्नांचा भाग असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

CM Devendra Fadnavis : दूध भेसळीच्या विरोधात मुख्यमंत्री आक्रमक !

वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या व्यापारास कठोरपणे बंदी घालण्यात आली आहे. या प्रकारची तस्करी केल्यास आरोपींना कठोर शिक्षा होत असल्याने नागरिकांनीही अशा अनैतिक कृत्यांबद्दल जागरूक राहावे आणि संशयास्पद गोष्टींविषयी संबंधित विभागाला तत्काळ माहिती द्यावी.