The ‘non-cooperation’ of the cooperative sector : जिल्ह्यातील विकासकामांवर होतोय परिणाम
राजकारण आणि सहकार हे विकासाच्या मार्गातील दोन महत्त्वाचे घटक. यातील एक घटक जरी कमकुवत असला तरी विकासकामांवर त्याचा थेट परिणाम होतो. असाच काहीसा प्रकार अकोला Akola जिल्ह्यात घडला आहे. सहकार क्षेत्रातील कमकुवतपणामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यात शेतकरीही भरडला जात आहे, ही दुर्दैवी बाब ठरते आहे.
Akola अकोला जिल्ह्यातील सहकाराचे गड म्हणून अकोट Akot व तेल्हारा Telhara हे दोन तालुके ओळखले जातात. सर्वाधिक सहकार नेते या दोन तालुक्यांतूनच उदयास आले आहेत. असे असतानाही तेल्हारा येथील खरेदी विक्री संघ व बाजार समितीच्या अंतर्गत राजकारणात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधी येथील कापूस खरेदी केंद्र बंद पडले व त्यानंतर नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राने आपला गाशा गुंडाळला.
शेतकऱ्यांना हमीभावाने त्यांचा शेतमाल विकता यावा हा उद्देश आहे. याच दृष्टिकोनातून नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी व सीसीआयमार्फत कापूस खरेदी केली जात आहे. मात्र, तेल्हारा तालुक्यातील शेतकरी या दोन्ही केंद्रांपासून वंचित झाले आहेत. बाजार समिती व खरेदी विक्री संघातील सहकार नेत्यांच्या वादात शेतकरी भरडला गेला आहे. यापूर्वीही तेल्हारा खरेदी विक्री संघावर प्रशासक नियुक्तीची वेळ आली होती. तीन वर्ष येथे प्रशासकीय राज्य होते. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे परत करण्यात आले. त्यामुळे अनेक अडचणी आल्या होत्या.
अखेर खरेदी विक्री संघाची निवडणूक झाली. येथे लोकनियुक्त पदाधिकारी कामकाज करू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या. पण त्यातच आता सहकार नेत्यांतील आपसातील मनमुटावामुळे बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. परिणामी कापूस व सोयाबीन हमीभाव केंद्र बंद करण्यात आले.
आमदारांचा असहकार
अकोट व तेल्हारा तालुक्यातील सहकार नेत्यांमध्ये अंतर्गत वाद आहेत. अशात अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनीही या वादापासून स्वतःला दूर ठेवले. त्यांनी एक प्रकारे असहकाराची भूमिका घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळातच आमदार भारसाकळे यांनी स्वतःला सहकार क्षेत्रापासून दूर ठेवले आहे. निवडणुकीपुरतेच ते सहकार नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यानंतर त्यांना या मतदारसंघाबाबत कोणतीही विशेष आस्था असल्याचे दिसून येत नाही.
सहकार क्षेत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व
अकोला जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भाजपची सत्ता असताना सहकार क्षेत्रातील नेत्यांचे राजकारण हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचे बघावयास मिळते. त्याचे परिणाम थेट शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.