After the accident, the car caught fire, two were killed : चालकाचे नियंत्रण सुटल्याने समृद्धी महामार्गावर घडला अपघात
Buldhana चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने दाेघांचा आगीत हाेरपळून मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना समृद्धी महामार्गावरील दुसरबीड टाेलनाक्याजवळ घडली. अपघात इतका भीषण होता की ड्रायव्हर साइडचा सुरक्षा कठडा कारमध्ये आरपार घुसला.
मुंबई येथील गणेश सुभाष टेकाळे (वय ४०), राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२) आणि चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५) हे तिघे कार क्रमांक MH-04 LB-3109 ने अकोला कडे निघाले होते. समृद्धी महामार्गावरील दुसरबिड टोलनाका ओलांडून सुमारे ५०० मीटर अंतरावर गेल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार नागपूर-मुंबई कॉरिडॉर विभागणाऱ्या सुरक्षा कठड्याला जोरदार धडकली.
Samruddhi Mahamarg : खासगी बसचा अपघात; एक ठार, २० प्रवासी जखमी
अपघात अत्यंत भीषण होता. वेगात असलेल्या कारमध्ये सुरक्षा कठडा आरपार घुसला आणि मागील बाजूने बाहेर निघाला. घर्षणामुळे कारने तात्काळ पेट घेतला. या दुर्घटनेत टेकाळे आणि जयस्वाल यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर चालक अभिजीत चव्हाण याला मदत कार्यकर्त्यांनी बाहेर काढण्यात यश मिळवले. प्राथमिक उपचारानंतर त्याला बीबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.
Maharashtra Government : समृद्धी महामार्गावर एकाच रात्री तीन अपघात!
डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शहा आणि चालक दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी महामार्ग QRV टीम आणि महामार्ग पोलीस: PSI गजानन उज्जैनकर, शैलेश पवार, पोहेकॉ. विठ्ठल काळुसे, मुकेश जाधव, संतोष वनवे, संदीप किरके, अरुण भुतेकर आणि एमएसएफ स्टाफ यांनी त्वरित मदतकार्य हाती घेतले. किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरवाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.