Always be there to solve the teacher’s problems : खासदार अनुप धोत्रे यांचा शब्द; महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचा मेळावा
Akola शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम त्यांच्यासोबत राहणार आहे. त्यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या मागणीसाठी आग्रही असणार आहे, अशी ग्वाही खासदार अनुप धोत्रे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित शिक्षक मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर मंथन करण्यात आले.
या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक होते.
मेळाव्याच्या प्रारंभी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे यांनी संघटनेचा प्रवास आणि शिक्षकांच्या प्रमुख मागण्या मांडल्या. “शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद बुद्रुजम्मा, सुनील जानोरकर, अतुल भालतिलक, रितेश मिर्झापुरे, प्रकाश डवले, संजय देशमुख, दिनेश काटे, मोहम्मद कमरुद्दीन, ज्ञानेश्वर चव्हाण, दीपक कुलकर्णी, जमीर पटेल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले की, “शिक्षकांच्या प्रश्नांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न करून त्यांचे निराकरण करण्यासाठी मी खंबीरपणे उभा राहीन.” आमदार किरण सरनाईक यांनी संघटनेच्या “प्रेरणादायी शिक्षण रत्न पुरस्कार” उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात अल्केश खेडकर, मोहम्मद जावेदजमा, प्रमोद गाठे, अविनाश मते, कैलास सुरडकर, गजानन सवडतकर, नितीन दिवनाले, मोहम्मद वसीम, अब्दुल नईम यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटनेचा लढा भविष्यातही सुरू राहणार असल्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.