There are no medical officers, the health system collapse : आमदार सुलभा खोडके यांचा सभागृहात सवाल
Amravati वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरलेली नाहीत. आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे. रुग्णांचे अजून किती हाल करणार, असा रोखठोक सवाल आमदार सुलभा खोडके MLA Sulbha Khodke यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यांनी आरोग्य व्यवस्थेतील समस्या आणि उपाययोजनांवर ठोस भूमिका मांडली.
खोडके यांनी अधिवेशनात राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी उपाययोजनांची मागणी केली. शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आणि विविध समस्यांमुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब त्यांनी निदर्शनास आणली. अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Assembly Budget Session : एकाच प्रश्नावर सत्ताधारी-विरोधकांनी मंत्र्यांना धरले धारेवर!
अधिवेशनात चर्चेसाठी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार अर्थसंकल्पाच्या ८% निधी सार्वजनिक आरोग्यावर खर्च होणे अपेक्षित आहे. असे असताना राज्य सरकार केवळ ४.९१% निधी खर्च करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये रिक्त पदे वाढली आहे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ आणि पायाभूत सुविधांची टंचाई निर्माण झाली आहे.
खोडके यांनी अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा अपुरा पुरवठा, सुविधा अपुऱ्या, तसेच रुग्णालयांची दुरवस्था झाली. यामुळे रुग्णांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याची आणि रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली.