Breaking

MLA Sulbha Khodke : आरोग्य खात्यातील पदोन्नतींमध्ये पक्षपात?

Selected officers in the health department getting promotions : पदे रिक्त असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी केले मान्य

Amravati आरोग्य विभागात एकाच अधिकाऱ्यावर दोन-तीन पदांचा कार्यभार दिला जात आहे. एवढेच नव्हे तर निवडक अधिकाऱ्यांवर विशेष कृपा केली जात आहे. त्यांनाच पदोन्नती देण्याचा प्रकार आरोग्य विभागात सुरू आहे, असा थेट आरोप आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत केला. आरोग्य व्यवस्थेतील एकूणच भोंगळ कारभारावर त्यांनी बोट ठेवले.

शासकीय रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत, याकडे आमदार खोडके यांनी लक्ष वेधलं.

खोडके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर दिले. शासकीय रुग्णालयांमध्ये रिक्त पदे असल्याचे मान्य केले. रिक्त पदांमुळे कार्यभार सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त जबाबदाऱ्या इतर अधिकाऱ्यांना दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Assembly Budget Session : वैद्यकीय अधिकारीच नाहीत, रुग्णांचे किती हाल करणार?

राज्यातील ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा आणि स्त्री रुग्णालयांमध्ये क्ष-किरण, सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि एमआरआय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णांना औषध यादीतील सर्व औषधे मोफत मिळत आहेत, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. तसेच, नवीन रुग्णालये आणि आधुनिकीकरणाच्या कामांसाठी शासनाने आराखडा तयार केला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तपासणी आणि उपचार निशुल्क उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Assembly Budget Session : एकाच प्रश्नावर सत्ताधारी-विरोधकांनी मंत्र्यांना धरले धारेवर!

खोडके यांनी शासकीय रुग्णालयांतील समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा याचे गंभीर परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होतील, असा इशारा दिला. आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी सरकारने जबाबदारी घ्यावी, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.