Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा पोलीस अधिक्षकांना फोन; कठोर कारवाईचे आदेश

 

Pankaja Munde angry over the incident in Jalna, orders strict action : जालन्यातील अत्याचाराची गंभीर दखल; बोराडे कुटुंबियांनी घेतली भेट

Jalna भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील कैलास बोराडे या तरूणावर झालेल्या अत्याचार प्रकरणाची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणात मारहाणीचा व्हिडिओ पुढे आल्यानंतर त्या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी पोलीस अधिक्षकांना फोन लावून त्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले.

यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आज दूरध्वनीवरून संपर्क साधून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, त्या तरूणाच्या कुटुंबियांनी पंकजा मुंडेंची मुंबईत भेट घेतली. महाशिवरात्रीच्या दिवशी अन्वा येथील रहिवासी असलेल्या कैलास बोराडे या तरुणास कार्ला जानेफळ येथील वटेश्वर मंदिरात भागवत दौंड व नवनाथ दौंड यांनी मारहाण केली.

Sudhir Mungantiwar : झरपट नदीचे पुनरुज्जीवन केवळ उपक्रम नाही, तर भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय!

 

भट्टीत गरम केलेल्या सळईने सर्व अंगावर डाग दिले. अतिशय अमानुषपणे अत्याचार केले. बोराडे याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पोलिस अधिक्षकांशी फोन करुन घटनेची सविस्तर माहिती घेतली. या घटनेतील एक आरोपी अटकेत आहे. दुसर्‍याचा शोध तातडीने लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले.

कैलास बोराडे या तरूणांच्या भावाने आणि कुटुंबातील सदस्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कैलासच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याबद्दल कुटुंबियांना आश्वस्त केले.

Pankaj Bhoyar : सर्वसामान्यांना परवडणारी घरे द्यायचीच आहेत !

 

माज आला आहे
या घटनेचा व्हिडिओ करणाऱ्यांवर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी मारहाणीचा व्हिडिओ बघितल्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मारहाण करताना व्हिडिओ शूट करणाऱ्यांना माज आला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या घटनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई होणार असल्याचा शब्द दिला.