Breaking

Shikshak Bank : शिक्षक बँक पदभरती घोटाळा; चौकशीत राजकीय हस्तक्षेप !

Political interference in the Recruitment Scam inquiry : परीक्षार्थ्यांसह बँकेच्या सभासदांची तीव्र नाराजी

Amravati Achalpur अचलपूर शिक्षक बँक पदभरती घोटाळ्यात भक्कम पुरावे आहेत. तरीसुद्धा पोलिस तपास संथगतीने सुरू आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांसह बँकेच्या सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमके कोण या प्रकरणात दबाव टाकत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

दि अमरावती जि.प. शिक्षक सहकारी बँकेची नोकरभरती फेब्रुवारी ते मे २०२३ दरम्यान पूर्ण झाली. प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच काही परीक्षार्थिंनी जिल्हाधिकारी अमरावती यांना गोपनीय पत्र दिले. बँकेत जवळच्या मुलांना नोकरी देण्यात आल्याचे पत्रात नमूद केले. अंतिम यादी जाहीर झाल्यावर यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली. आधी दिलेली नावे अणि अंतिम यादीतील नावे यांच्यात साम्य आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यामुळे निश्चितच या भरतीत फार मोठा घोटाळा झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे मत झाले आहे.

Sindhutai Sapkal : जगातील २५ देशांना सिंधूताईंनी लावली माया!

प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश सहकार खात्याला दिले. सहकार खात्याने तातडीने चौकशी करुन गंभीर ताशेरे ओढले. आणि सखोल चौकशीची शिफारस केली. अहवालाच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले. मात्र आयुक्त कार्यालयाने या गंभीर बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.

आयुक्त कार्यालयाने चौकशी अधिकारी नेमला. बँकेचे संचालक, नोकरीला लागलेली मुले, बँकेचे मुख्य व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच काही सभासदांचे बयाण नोंदवून घेतले. इतके करूनही तपास अधिकाऱ्याने सदर प्रकरणाची फाईल कपाटात गुंडाळून ठेवली.

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेची अमरावतीत मोर्चे बांधणी !

मंत्रालयाकडे करणार तक्रार
शिक्षक बँक पदभरती घोटाळा प्रकरणात काही लोकांचे बयाण सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी नोंदविले. अधिकृत पुरावे दिले. परंतु पोलिसांना काय पाहिजे हे कळत नाही. पंधरा दिवसांत सकारात्मक चौकशी झाली नाही, तर गृहमंत्र्यांकडे पुरावे पाठवू. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि आंदोलन उभे करू, असा इशारा तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. या प्रकरणात न्यायालयीन लढा लढण्याची तयारी असल्याचेही या विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.