Breaking

Bachhu Kadu on Nana Patole : अहो नाना, पहिले काँग्रेस कुठे आहे ते शोधा!

Congress should first search for itself, then make an offer : पटोलेंच्या ऑफरवर बच्चू कडूंचा जोरदार टोला, सगळ्यांना ईडीची भीती

Amravati राज्यभर धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असताना राजकीय वर्तुळात मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. त्यामुळे चांगलीच राजकीय जुगलबंदी बघायला मिळत आहे. नानांच्या या विधानाची प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. त्यांनी काँग्रेसला स्वतःचा शोध घेण्याचा सल्ला दिला आहे.

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. ‘आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांनी आमच्यासोबत यावे. आम्ही त्यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊ,’ अशी ऑफर नानांनी दिली होती. होळीच्या निमित्ताने केलेल्या या वक्तव्याने भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Harshwardhan Sapkal : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने

त्यात बच्चू कडू यांनी नाना पटोलेंच्या या वक्तव्यावर उपहासात्मक टीका करत काँग्रेसलाच डिवचले आहे. ‘नानाभाऊंची ऑफर मोठी मजेशीर आहे. पण आधी काँग्रेस कुठे आहे ते त्यांनी शोधायला पाहिजे. काँग्रेसकडे सध्या २० आमदार आहेत. त्यातील एक तर शिंदे गटात गेला आहे. त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचा पक्ष स्थिर आहे की नाही हे पाहावे,’ असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला.

राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना ईडीच्या धाकामुळे कोणीही काँग्रेसच्या ऑफरला सकारात्मक प्रतिसाद देणार नाही, असेही ते म्हणाले. ‘जोपर्यंत केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. तोपर्यंत कोणीही जागेवरून हलणार नाही. ईडीचे फटके बसण्याची भीती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही आहे. त्यामुळे काँग्रेसची ऑफर स्वीकारण्याचे धाडस कोणी करणार नाही,’ असा टोलाही बच्चू कडूंनी लगावला.

Sharad Pawar : AI तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार

धर्माच्या नावावर राजकारण करून शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘आघाडी असो वा युती, दोघांनीही शेतकऱ्यांना चकनाचूर करून टाकले. कपडे असोत किंवा पक्षांचे झेंडे, सगळा कापूस हा शेतातून आलेला असतो. पण मारला जातो तो शेतकरीच,’ असं बच्चू कडू म्हणाले.