Mahayuti Government : मार्चपूर्वी कापूस विकला, आता भाव वाढला!

 

Cotton farmers suffer losses due to government policies : भाववाढीचे वरातीमागून घोडे : शासनाच्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका

Wardha ‘सीसीआय’ने कापूस खरेदी गुंडाळल्यानंतर व शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी येऊ लागली. कापूस विकल्यानंतर भाववाढ होणे म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे दिसून येते.

संपूर्ण हंगामात कापसाचे दर नियंत्रणात होते. शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी धावाधाव केली. शेतकरी दोन-दोन दिवस रांगेत होते. नंतर खासगी दराप्रमाणेच कापसाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडले. आता ९० टक्के कापूस संपला आहे. अशावेळी कापसाच्या दरात क्विंटल मागे ४०० रुपयांची वाढ झाली. याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना झाला.

यामुळे ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार असल्याचे शेतकरी सांगत आहे. शेतकऱ्यांनी मार्चपूर्वीच कापूस विकला. सीसीआयची हमी दरातील कापूस खरेदी बंद झाल्यानंतर खुल्या बाजारात कापसाचे दर पडले. ६८०० ते ७१०० रुपये क्विंटलपर्यंत कापूस विकला गेला. आता हे दर ७६०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली. ही वाढ हंगाम संपण्यापूर्वी झाली असती तर त्याचा लाभ गरजवंत शेतकऱ्यांना झाला असता. कापूस शिल्लक नसताना झालेली वाढ व्यापाऱ्यांच्या पदरी पडण्याची शक्यता आहे.

Vidarbha Farmers : एकाच दिवशी १७ हजार क्विंटल कापसाची आवक!

 

हमी केंद्र बंद होणार हे माहिती होताच शेतकऱ्यांनी युद्ध पातळीवर सीसीआयला कापूस विकला. आता मोजके शेतकरी शिल्लक आहे. त्यांनी दर वाढतील, म्हणून कापूस रोखला. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. उसनवारी, कर्जाची परतफेड करण्यासाठी कापूस घरी आल्याआल्याच विकावा लागला.

Vidarbh Farmers : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य

उन्हाळ्यात कापसाचे वजन घटते. आग लागण्याचे प्रकार वाढतात. शिवाय कापसाचा रंग बदलण्यास सुरुवात होते. यामुळे कापूस विक्री मार्चपूर्वीच आटोपली. आता दर वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर ५२ हजार रुपये, पर खंडीवरून ५३ हजार ५०० रुपये पर खंडीवर पोहोचले. यात खंडीमागे दीड हजार रुपयांची वाढ झाली. ३३०० रुपये क्विंटलची सरकी आता ३८०० रुपये क्विंटलवर पोहोचली. यात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली. याचा परिणाम कापूस दराच्या वाढीवर झाला.